Home मराठवाडा वार्ड क्र.३२ भडकल गेट , बुढ्ढीलैन रचने व मतदारसंख्येत आक्षेप घेतले –...

वार्ड क्र.३२ भडकल गेट , बुढ्ढीलैन रचने व मतदारसंख्येत आक्षेप घेतले – समाजसेवक मुख्तार खान

66
0

अब्दुल कय्यूम

औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद सार्वत्रिक निवडणूक सन २०२० मध्ये वार्ड क्र.३२ भडकल गेट , बुड्डीलेन हा ड्रा मध्ये सर्व साधारण महिलेसाठा राखीव सोडण्यात
आलेला आहे. सदरील वार्डामध्यये मागील एक माहिन्यापुर्वी नविन रचना करुन या
वार्डामध्ये १२११९ मतदाराचा समावेश करण्यात आला होता. परंतु दोन दिवसापूर्वीच
महानगरपालिका निवडणूक विभाग कार्यालयातून वार्ड क्र.३२ भडकल गेट, बुढ्ढीलेन या वार्डाची मतदान यादी प्रसिध्द करण्यात आलेली असुन त्यामध्ये १२११९ ऐवजी १४७०५ मतदाराची नोंद दाखवण्यात आलेली आहे. ज्यामध्ये २५८६ मतदारांचा जास्तीचा समावेश करण्यात आलेला आहे. पुर्वीच्या वार्ड रचने मध्ये एम.आय.एम. पक्षाचा
विजयी निश्चित दिसून येत होता. परंतू महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी संगणक नमत करुन व काही राजकिय संघटनेच्या नेत्यांशी आर्थिक व्यवहार करुन सदरील वार्डा ची मतदार संख्या हेतूपुरस्सर वाढवण्यात आली आहे. वार्ड क्र.३२ भडकल गेट , बुढ्ढीलैन शहरातील इतर वार्डा शी तुलना केली असता इतर वार्डांची मतदार संख्या ३ ते ५ हजार मतदार संख्येच्या दरम्यान आहे. जे काही योग्य असून वार्ड क्रं 32 मधील मतदान संख्या ही १४७०५ बेकायदेशीर असून. अशाच प्रकारे इतर बऱ्याच वार्डामध्ये देखील एमआयएम पक्षाचा पराभव करण्यासाठी कट कारस्थान रचण्यात आहे आहे. एक महिन्यापूर्वी वार्ड क्रं 32 ची नविन वार्डरचना करण्यात आली होती. ते आम्हाला मान्य होती त्यामुळे आम्ही त्यावेळी आक्षेप घेतला नव्हता. परंतु आजरोजी सदरील वार्डाच्या वार्डरचनेमध्ये बेकायदेशीर फेरबदल करण्यात आलेला आहे तो मान्य नाही. महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून वार्ड क्रं 32 भडकल – बुढ्ढीलैन या वार्डात योग्य ते मतदान यादीत बदल करण्यास आमचा आक्षेप मान्य करून त्यावर योग्य कारवाई करून सदर वार्डाच्या मतदान संख्येत फेरबदल करावे अन्यथा मा. न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी समाजसेवक मुख्तार खान मजिद खान याची आज तक्रार समाजसेवक मुख्तार खान यांनी राज्य निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्तांना पोस्ट व्दारे केली आहे.