Home जळगाव धरणे आंदोलना चे ७२ व्या दिवसात पदार्पण

धरणे आंदोलना चे ७२ व्या दिवसात पदार्पण

78
0

राष्ट्रीय जनसंख्या नोंदणीला विरोध सर्वानुमते ठराव…!

रावेर – शरीफ शेख

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदयाला विरोध तसेच राष्ट्रीय जनसंख्या नोंदणीचा बायकॉट म्हणून ७१ दिवसापासून धरणे आंदोलन सुरु असून गुरुवारच्या या धरणे आंदोलनात जळगाव शहरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.

*आंदोलनाची सुरुवात*

शेख हसन नूर मोहम्मद यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर समारोप शरीफ शाह यांच्या दुवा ने करण्यात आले.

12 मार्च गुरुवार रोजी तिथि अनुसार शिवजयंती असल्याने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती व त्यांच्या राज्यात व सैन्यात प्रमुख व महत्वाच्या जागेवर मुस्लिम लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता परंतु अशा या थोर महापुरुषाचे फोटो हिंदू राष्ट्र जागरण समितीने लावून एक प्रकारे त्यांच्या हिंदवी स्वराज्या च्या स्थापनेस प्रश्न निर्माण करण्याचा चुकीचा प्रयत्न केल्याचे फारुक शेख यांनी आपल्या सुरवाती च्या भाषणात स्पष्ट केले व मंच च्या व्यासपीठावरुन एन पी आर ला विरोध नव्हे तर त्याचा बायकॉट करण्याचा ठराव सादर करताच त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

*यांनी केले मार्गदर्शन*

यावेळी भुसावळचे जुनेद खान व समरीन रफिक खान यांनी तरुणाईला उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले सय्यद फरहान व रागिब ब्यावली यांनी शायरी व कवितेच्या माध्यमाने आपले म्हणणे मांडले, डॉक्टर अमानुल्ला शहा ,फिरोज मुलतानी व शरीफ शाह यांनी धरणे आंदोलन द्वारे एन पी आर च्या बायकॉट करण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकला.
उमर फारूक शेख यांनी या कायद्याबाबत व इस्लाम धर्माच्या पवित्र कुराणात नमूद केल्याप्रमाणे आपल्यावर काय जबाबदारी आहे हे उदाहरणासह स्पष्ट केले.
करीम सालार यांनी केंद्र सरकार व दिल्ली पोलीस यांनी दोघांनी कशाप्रकारे दिल्लीमधील दंगल घडवली व गृहमंत्र्यांनी त्यांना कसे वाचवले हे नमूद केले.
*यावेळी विशेष उपस्थितांमध्ये*
नगरसेवक रियाज बागवान, हसन शेख ,डॉक्टर वकार सत्तार, ईद गाह समितीचे अनिस शाह व ताहेर शेख ,जामा मजीद चे सलीम शेख, इकबाल कॉलनी चे हारुन शेख ,शिरसोली चे अब्दुल नबी मिस्तरी, इस्लामपूरा चे सय्यद शाहिद व अन्वर सिकलिगर, सुप्रीम कॉलनी चे अकील खान, मुस्लिम कॉलनीचे हाफिज शहीद, वायरल न्यूज मुफ़्ती हारून नदवी,इकरा कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर इक्बालशाह, नूतन मराठा कॉलेजचे माजी एच ओ डी प्रोफेसर एम एकबाल ,यांची उपस्थिती होती

*महिलांची विशेष उपस्थिती*
या धरणे आंदोलनात मागील पंधरा दिवसापासून मन्यार वाड्यातील जुबेदा सय्यद चाँद यांच्या सह सुमारे १५ ते २० महिला रोज सकाळी ११ वाजता आपली उपस्थिती देतात त्यात प्रामुख्याने मारिया फातेमा सय्यद, मोनिसा फातेमा रिजवान, शबीना सय्यद रिजवान, सुलताना शेख युनूस ,सकीना शेख इस्माईल, सबनूर बी शेख हैदर, फातेमा शेख रहमतुल्ला, रुबीना शेख ईबा, नसीम अब्‍दुल कयूम ,सबा अब्दुल कय्यूम,फरजाना रईस , रिजवाना सय्यद हारून, शमीम बी सैय्यद अमर ,अमृन बी शेख जावेद , सलमा शेख इम्रान, शकीला शेख सिकंदर ,समरीन रफिक खान, जमिला बी कासम,

*उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*

सय्यद चांद अमीर यांच्या नेतृत्वात गुलनाज मो अयाज , जमिला बी शेख कासम, मारिया सय्यद हरीश, सैय्यद साबीर , फारूक अहेलेकार , राजील देशमुख , अलाउद्दीन खाटीक व अन्वर सिकलिगर यांनी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन दिले.