Home उत्तर महाराष्ट्र शिवकार्य गडकोटच्या श्रमदानात रामशेजवरील सैनिकांचे जोते केले भक्कम

शिवकार्य गडकोटच्या श्रमदानात रामशेजवरील सैनिकांचे जोते केले भक्कम

49
0

रामशेजच्या पश्चिमेकडे बुरुज व तट शोधण्यास यश.

नाशिक – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची १०२ वी दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम ८ मार्च २०२० रोजी किल्ले रामशेजवर झाली.या मोहिमेत भर उन्हात दुर्गसंवर्धकांनी किल्ल्याच्या पश्चिमेस मातीत बूजलेल्या सैनिकांच्या जोत्याला भक्कमता आणली,तसेच या जोत्याच्या पाऊलखुणा उजेडात आणल्या,तसेच किल्ल्याच्या पश्चिमेस मोठे तट व एक मोठा बुरुजही शोधून काढला.
नाशिक जिल्ह्यातील ६० हुन अधिक गडकोटांच्या अस्तित्वासाठी गेल्या १० वर्षे राबणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची दुर्गसंवर्धन मोहिमेसाठी पहाटेच दुर्गसंवर्धकानी किल्ल्यावर चढाई केली.किल्ल्यांवरील दुर्गप्रेमींना रामशेजची समग्र माहिती देण्यात आली.किल्ल्याच्या माथ्यावर लावलेल्या चाफ्याच्या झाडांना पाणी घालण्यात आले.त्यानंतर किल्ल्याच्या पश्चिमेस असलेल्या पूर्ण मातीत बूजलेल्या जोत्यांचे अस्ताव्यस्त दगड जोत्यांवर ठेवून एकत्रित करण्यात आले,तसेच सैनिकांचे जोते हा ऐतिहासिक वारसा दर्शनी करण्यात आला.त्यावेळी या श्रमदानात कोल्हापूर येथील दुर्गप्रेमींनी ही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तसेच शेवटी किल्ल्याच्या पश्चिमेस काठाला लागून असलेल्या ठिकाणी भूषण औटे या दुर्गसंवर्धकाने मोठ्या शिताफीने एक साबारात दडलेला बुरुज व तटाची भिंत सर्वांसमोर आणली,यावरून रामशेजच्या सुरक्षेसाठी असलेली भक्कम बांधकामे मोठया इतिहासाला गवसणी घालतात.या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,श्रमदान समिती संयोजक भूषण औटे,अमोल बच्छाव,रोहित गटकल,
विश्वस्त पवन माळवे,दत्ता मोढवे,हर्षल पवार,कोमल माळवे,कु तन्मय बुरकुल,कोमलताई माळवे,तन्मय बुरकुल,आर्यन बुरकुल,कु.शिवाश माळवे,कोल्हापूर येथील दुर्गप्रेमी धनाजी लोहार,मारुती उईके,भास्कर येडगे,प्रशांत लोहार,सुशांत चितळे,विजय पाटील,विशाल भोसले,निखिल सलामे यासह दुर्गसंवर्धक रामशेजच्या श्रमदानात उपस्थित होते.
आपला:-
श्री.राम खुर्दळ , संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था , नाशिक जिल्हा मो. 9423055801