Home महत्वाची बातमी मुंबई उच्च न्यायालयाने दिली स्थगिती , खा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामींना मोठा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने दिली स्थगिती , खा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामींना मोठा दिलासा

209

राजेश भांगे

मुंबई – जात पडताळणी समिती सोलापुर यांनी दिनांक २४/०२/२०२० रोजी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरण अवैध करत जात प्रमाणपत्र जप्तीचे आणि फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल करण्याचे आदेश तहसिलदार अक्कलकोट यांना दिले होते.

सदरील समितीच्या आदेशाला डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजींनी मुंबई उच्च न्यायालायात रिट याचिकेद्वारे आव्हान दिले.दरम्यानच्या काळात तहसिलदार अक्कलकोट यांनी फौजदारी न्यायालयात समितीच्या निर्णयान्वये तक्रार दाखल केली. ज्या अनुषंगाने न्याय दंडाधिकारी यांनी महास्वामीजी व इतर यांचे विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश सदर बाझार पोलिसांना दिले होते.सदर बझार पोलिस ठाणे यांनी महास्वामीजी व इतर यांचे विरूध्द गुन्हा नोंदविला परंतु दिनांक ११/०३/२०२० रोजी मा.उच्च न्यायालयात महास्वामीजींच्या याचिकेवर दोन्ही पक्षकारांकडून सविस्तर युक्तीवाद करण्यात आला.आज दिनांक १२/०३/२०२० रोजी मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयास व त्याच्या परिणामास तसेच अंमलबजावणीस अंतरीम स्थगिती देऊन पुढिल सुनावणी ८ एप्रिल २०२० रोजी ठेवली आहे.समितीच्या निर्णयाच्या परिणामास व अंमलबजावणीस स्थगिती निकाल दिल्या कारणाने डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांना मोठा दिलासा मिळाला असुन त्यांचे विरूध्दचे प्रस्थापित फौजदारी गुन्ह्यालाही मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थगिती मिळाली आहे.संबधित प्रकरणात महास्वामीजी तर्फे जेष्ठ विधिज्ञ श्री.प्रसाद ढाकेफाळकर,
ॲड.महेश स्वामी औरंबाद,ॲड.अनुप पाटील,ॲड.महेश देशमुख यांनी युक्तीवाद केला.प्रतिवादी तक्रारदारातर्फे ॲड .श्रीहरी अणे,ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्यातर्फे युक्तीवाद करण्यात आला. मा. उच्च न्यायालयाने उभय पक्षकारांचा संपूर्ण युक्तीवाद ऐकल्यानंतर वरील निर्णय दिला.