Home विदर्भ रमैय्या एम. राजकुमार यांच्या शुभहस्ते अस्तित्व गुणगौरव पुरस्कार वितरण संपन्न

रमैय्या एम. राजकुमार यांच्या शुभहस्ते अस्तित्व गुणगौरव पुरस्कार वितरण संपन्न

50
0

यवतमाळ , दि. १२ :- महिला दिनाचे औचित्य साधून दि. ११ मार्च रोजी जेष्ठ नागरिक भवन महादेव नगर यवतमाळ येथे अस्तित्व फौंऊंडेशन यवतमाळच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धां मध्ये विजयी स्पर्धकांना पुरस्कार व सामाजीक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतुलनिय कामगिरी करणार्‍या सामाजिक कार्य करणार्‍या महिला व युवकांचा अस्तित्व गुणगौरव पुरस्कार जेष्ठ समाज सेविका रमैय्या एम. राजकुमार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती लताताई खांदवे, अस्तित्व फौऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. अलका कोथळे, डॉ. कविता बोरकर आदि मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुुरुवात स्मिता भट यांनी अस्तित्वचे थिम गित गाऊन सुरुवात केली तर रुपाली निमकर यांनी निर्भया हिंगणघाट थिम सादर केली. या प्रसंगी सौ. सायली कोथळे यांनी आपल्या बहारदार नृत्य सादर केले. या प्रसंगी सुप्रसिद्ध जादुगर तेजा यांच्या जादुच्या प्रयोगातून विविध प्रात्यक्षिके दाखवून तिरंगा शो ने उपस्थित महिलांची मने जिंकली या तिरंगा शो बद्दल रमैय्या एम. राजकुमार यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. जादुच्या शो चे संचालन कु. प्राजक्ता टिकले यांनी केले.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणार्‍या वंदनाताई ठवकार, डॉ. अश्‍लेषा भांडारकर अहमदनगर, महिला पत्रकार आरती ताई गंधे, डॉ. सारिका शहा, डॉ. अंजली गवार्ले, सौ. खुशाली पोपट, पुर्वा दोंदलवार अहेरी, उषा पानसरे अचलपूर, मंगलाताई माळवे, मीराताई फडणीस या महिलांना तर प्रेस संपादक पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला, अजय झरकर, जादुगर तेजा, गुड्डू भाऊ जयस्वाल आदिंना अस्तित्व गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजित निबंध स्पर्धेमध्ये कु. भक्ती महेश जोशी, पल्लवी सोन, चारुलता बर्‍हाणपुरे, कवीता तातेड, प्रोत्साहन पर वर्षा धवने आदिंना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर रागोळी स्पर्धे मध्ये प्रथम रुपाली निमकर, द्वितीय राहुल गुल्हाणे यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर लकी लेडी म्हणून रितु गायकवाड, मिरा पांडे ह्या ठरल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा अलका कोथळे यांनी केले तर संचालन कीर्ति राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. कविता बोरकर, सुरूची खरे, डिंपल नक्षणे, सारिका ताजने, करुणा धानेवार, योगिता शिरभाते, निलीमा राऊत, हर्षा कहारे, स्मिता दुर्गे, सरोज बरदेहे, प्रियंका कदम, वर्षा पडवे, प्रतिभा मुडे आदि प्रयत्नशिल होते.

Unlimited Reseller Hosting