Home महत्वाची बातमी चीन मधून प्रसारित झालेल्या संसर्गजन्य विषाणू म्हणजेच Corona Virus कोरोना व्हायरस बाबत…शंभुसेना...

चीन मधून प्रसारित झालेल्या संसर्गजन्य विषाणू म्हणजेच Corona Virus कोरोना व्हायरस बाबत…शंभुसेना सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक प्रबोधन..अभियान नक्की वाचा..!

152

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

पुणे , दि. १२ :- ( शंभुसेना संघटनेचे आरोग्य संवर्धन अभियान )….
🌑 चीनमध्ये साथीतुन आलेल्या कोरोना वायरस बाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटलं जातं) आता भारतातही त्या वायरसचा धोका होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून दक्षता बाळगली जात असली तरी देखील भारतासह राज्यातील इतरही सामाजिक संस्था, संघटना, देवस्थानांनी यात प्रबोधन आणि सतर्कता बाळगली पाहिजे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शंभुसेना संघटनेप्रमाणे प्रबोधन करत कोरोना संसर्ग कसा रोखला जाईल, प्राथमिक काळजी कशी घ्यावी याबाबत प्रत्येकांनी आपल्या आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन समाजसेवी पत्रकार मंडळींनी केले आहे.

🌑कोरोना व्हायरसने इतर देशांप्रमाणे भारतातही प्रवेश केला आहे. याबाबत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची 28 प्रकरणं समोर आली आहेत.” ही प्रकरणं तेलंगण, जयपूर आणि दिल्लीत समोर आली आहेत. त्यांच्यावर सध्या देखरेख ठेवण्यात येत आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका चीनला बसला आहे.
राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिंनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चीन आणि हाँगकाँगहून परतलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. तसंच प्रवाशांना विमानात चढण्याआधी सेल्फ रिपोर्टिंग फॉर्म भरावा लागेल.
नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार देशातील सातही विमानतळांवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन व्हावं, यासाठी आपण या सर्व विमानतळांच्या संपर्कात आहोत, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
याशिवाय सर्व विमानतळांवर या विषाणूसंबंधीची माहिती देणाऱ्या उद्घोषणा सुरू आहेत. हा विषाणू एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत संक्रमित होत असल्याने त्याचा धोका अधिक वाढला आहे. या विषाणुमुळे चीनमध्ये आतापर्यंत खुपच मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने देखील याविषयावर चर्चा करण्यासाठी तात्काळ बैठक बोलावली आहे. कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी का, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
अमेरिकेतही या विषाणुची लागण झालेले रुग्ण आढळले आहे. ही व्यक्ती चीनमधल्या वुहान प्रांतातून अमेरिकेत आल्याचं तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.कोरोना विषाणूची सर्वप्रथम माहिती मिळाली ती डिसेंबर महिन्यात. मात्र, आता हा विषाणू चीनची सीमा ओलांडून इतर देशातही पोचला आहे.
अमेरिकेपूर्वी जपानमध्ये एक तर थायलंडमध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते.

🌑 कोरोना विषाणू आहे काय ?

रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे. या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.

🌑 कोरोनाची लक्षणे :

– डोकेदुखी
– नाक गळणे
– खोकला
– घसा खवखवणे
– ताप
– अस्वस्थ वाटणे
– शिंका येणे, धाप लागणे
– थकवा जाणवणे
– निमोनिया, फुफ्फुसात सूज
हा विषाणू अजूनही नियंत्रणात आणता येईल, असं यापूर्वी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटलं होतं.

🌑 कोरोना विषाणू किती गंभीर आहे ?

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.
युनिवर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये प्राध्यापक असलेले मार्क वूलहाऊस म्हणतात, “हा नवीन कोरोना विषाणू आम्हाला आढळला तेव्हा आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम इतका घातक का आहे. सर्दीची सामान्य लक्षणं यात दिसत नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.”

🌑 कोरोना विषाणू आला कुठून?

कोरोना हा विषाणुचा नवीनच प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही. नॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, “हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे.” सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही.

🌑 कोरोनाचा उगम चीनच का?

प्रा. वूलहाऊस यांच्या मते लोकसंख्येचं जास्त प्रमाण आणि त्याची जास्त घनता यामुळे चीन मधले लोक लगेच प्राण्यांच्या संपर्कात येतात. ते म्हणतात,की “येणाऱ्या काळात चीनमध्येच पुन्हा असं काही ऐकायला मिळालं, तर त्यात आश्चर्य वाटणार वाटायला नको.”

🌑 कोरोना विषाणूचा फैलाव सहज होतो का?

या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची अनेक उदाहरणं समोर आल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांची देखभाल करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही या विषाणुची लक्षणं दिसली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
या विषाणु विषयी चिंता वाटण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या विषाणुमुळे सर्वांत आधी फुफ्फुसांवर परिणाम होतो. या विषाणुची लागण होताच व्यक्तीला खोकला सुरू होतो. मात्र, सध्या जी कोरोनाग्रस्त लोकांची आकडेवारी मिळते आहे तीच अंतिम असेल, असं आताच म्हणता येणार नाही.

🌑 कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे का?

या विषाणूचा परिणाम मर्यादित असेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणं पुढे आली.या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीन मधल्या इतर शहरात आणि चीन बाहेरही झालेला आहे.थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे.
कोरोनाची लागण झालेल्या सर्वच लोकांची ओळख पटली आहे, असं गरजेचं नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे नवीन वर्षांत चीनमधे फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव चीन बाहेरील अनेक देशांमधल्या लाखो लोकांमध्ये झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

🌑 उपाय योजना:

कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत.
या सर्व उपाययोजना केवळ चीनमध्ये करण्यात आल्या आहेत, असं नाही. चीन व्यतिरिक्त आशियातील इतर अनेक देश आणि अमेरिकेतही असेच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.

🌑 तज्ज्ञ काय सांगतात ?

डॉ. गोल्डिंग म्हणतात, “सध्या आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार परिस्थिती किती चिंताजनक आहे, हे सांगणं कठीण आहे. कोरोना विषाणूच्या स्रोताची माहिती मिळत नाही तोपर्यंत अडचणी कायम राहणार आहेत.” माणसाला संसर्ग करणाऱ्या आणि विशेषतः पहिल्यांदाच संसर्ग करणाऱ्या प्रत्येक विषाणुविषयी चिंता करायला हवी, असं प्रा. बॉल यांचं म्हणणं आहे. कारण जेव्हा पहिल्यांदाच एखाद्या विषाणुचा फैलाव होतो तेव्हा तो कसा रोखायचा, त्यावर कोणते उपचार आहेत, हे सगळं जाणून घेण्यात बराच वेळ जात असतो. त्यामुळे कोणत्याही संसर्गजन्य वायरसचा धोका टाळायाचा असल्यास सर्वांनी आरोग्य संवर्धक टिप्स स्वतः अंगीकाराव्या लागतील हे मात्र नक्की..

🌑 शंभुसेना सामाजिक संघटनेचे आरोग्य संवर्धन अभियान,प्रबोधन आवाहन :

भारतातील लोकांनी कोरोना वायरसची भीती न बाळगता त्यावर नियंत्रण कसे आणता येईल आणि तो आपल्याला कसा होणार नाही याचीच प्रथम काळजी घेतली तर कोरोनाचा अटकाव होऊ शकतो तसेच उघडयावरचे खाणे टाळावे, गर्दीत जाणे टाळा, शक्यतो तोंडाला रुमाल अथवा मास्क बांधा, हात वारंवार स्वच्छ धुवा, शक्यतो शाकाहार घ्यावा, सार्वजनिक ठिकाणी गेल्यास काळजी घ्या, शक्यतो शेक हैन्ड टाळत नमस्कार करा, अनेकांनी एका ताटात जेवणे टाळा, हाताच्या बोटांची नखे वाढु देऊ नका, खोकताना अथवा शिंकताना रुमाल धरा किंवा हात लावा, हॉटेलमधील वेटर लोकांनी मास्क लावावा, सर्दी होऊ नये यासाठी अथवा सर्दी खोकला आल्यास घरगुती प्राथमिक उपाय करावेत व सरकारी डॉक्टरचा सल्ला घ्यावा असे आवाहन शंभुसेना सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के यांनी केले आहे.