Home मराठवाडा गुरु गोविंदसिंगजीच्या पवित्र भूमीत महिला पोस्ट ऑफिसचे दिमाखात उदघाटन संपन्न.

गुरु गोविंदसिंगजीच्या पवित्र भूमीत महिला पोस्ट ऑफिसचे दिमाखात उदघाटन संपन्न.

99
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड दि.७ मार्च रोजी केंद्र सरकारने देशातील महिला पोस्ट ऑफिस सुरू करण्याचे संकेत नुकतेच दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुगोविंदसिंगजी यांची पवित्र भूमी नांदेड येथील अशोकनगर येथे डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांच्या पर्येंतनाने जागतिक महिला दिनानिमिताने म्हणजेचं आठ मार्च दिवसा निमित्ताने नांदेड येथील महिला पोस्ट ऑफिसचे उद्घाटन डॉ. प्राचार्य अध्यापक विध्यालयाचे सुनंदा रोडगे यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले.

या उदघाटन प्रसंगी बोलताना सुनंदा रोडगे म्हणाल्या की सामाजिक जाणिव बदल्या शिवाय आपण यशस्वी होणार नाही. परंपरापासून जे विचार आहेत ते बदल पाहिजे मुला मुली मधील मतभेद आहेत ते आपल्या घरातूनच दूर केले पाहिजे महिला पूर्वी काचेचे भांडे होते आता ते लोखंडी भांडे झाले आहे ते कधीही फुटणारे नाही.
महिला प्रत्येक क्षेत्रात मध्ये काम करण्यात आववल आहेत. आज महिला देशाच्या सिमेवर देशाशाचे रक्षण करीत आहेत.एवढेच नव्हेतर आकाशात झेप घेऊन पुरुषा पेक्षा दोन पाऊल पुढे गेले आहेत असे आपले भाषणात सांगितले.
पुढे बोलताना डॉ. सुनंदा म्हणाल्या की पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या पोस्ट ऑफिस वर आज पण देशाच्या नागरिकांचा विश्वास आहे.
महिलांना उदघाटन करण्याची संधी दिलात त्या बदल मी डाक विभागाची आभारी आहे असे त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी पोस्ट ऑफिस चे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत महिला पोस्ट ऑफिस ला मार्गदर्शन करताना म्हणाले की आज पण ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिस व शहरी भागातील पोस्ट ऑफिस मध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत.
आजच पण नांदेड जिल्ह्यातील आदिवासी व दुर्मिळ भागात महिला पोस्टमन व पोस्ट मास्तर हे चागल्या प्रकारे काम करीत आहेत तसेच
पोस्ट ऑफिस मध्ये पासपोर्ट, वित विभागात मध्ये पण महत्वाच्या पदावर महिलांची निवड डाक विभागाने केली आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
डाक विभागात जनकल्याण योजना जनतेच्या दारा पर्येंत पोहचण्यासाठी आम्हीं रात्र व दिवस एक करीत आहोत याचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच डाक विभागाच्या निर्देशाप्रमाणे या कार्यक्रमात नागरिकांचे मूलभूत कर्तव्याचे वाचेन केले दररोज अंमलात आणावे व यांचा गावोगावी प्रचार व प्रसार करण्यात यावा डाक अधीक्षक यांनीं सांगितले तसेच महिला दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात व नांदेड मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजना विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे यांचा लाभ नागरिकांनी पोस्ट ऑफिस मध्ये येऊन घ्यावा असे अहवान डाक अधीक्षक यांनी आपल्या भाषणा मधून केले आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले साहयक डाक अधीक्षक संजय आबेकर यांनी महिला पोस्ट ऑफिस संदर्भात प्रथम माहिती दिली तर महिला पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्तर म्हणून अर्चना आहेर यांना मिळाला आहे साहयक पोस्ट मास्तर सोनी कांबळे यांना मिळाला आहे. डाक सेवक पदावर महानंदा देवणे हे काम पहाणार असल्याचे डाक अधीक्षक यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे साहयक प्रबधक अरुण गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन साहयक डाक अधीक्षक मनीष नवंलु यांनी केले आहे. या कार्यक्रमाला सरिता गुजराथी डाक वित विभाग,वर्षा जाधव, माया देशमुख, अर्चना चवडेकर, किरण डांगे भोसीकर, सोनी कांबळे, अर्चना आहेर, ज्योती कांबळे, पूनम लोखंडे, भोसीकर मॅडम डाक वित्त विभाग,महिला प्रधान एजन्ट,व अशोकनगर भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर नांदेडचे मुख्य पोस्ट मास्टर डी. एम.जाधव, साहयक डाक अधीक्षक डॉ. भगवान नागरगोजे, साहयक डाक अधीक्षक संजय आंबेकर, साहयक डाक अधीक्षक मनीष नवंलु,इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे प्रबधक राजेंद्र मगणाले, अरुण गायकवाड, डाक विभागाचे विपणन आधिकारी सुरेश सिंगेवार, नांदेडचे पोस्ट मास्तर एम.बी.माकोडे,डाक साहयक पी.के.पवार, आडगावकर,संदीप ठाकूर,संदीप मुदलकर, राजकुमार शिंदे, मोहन देशमुख, मुळे, ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते.