Home विदर्भ ध्यास संस्थेकडून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ध्यास संस्थेकडून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

130

आरिफ पोपटे – कारंजा

ध्यास संस्थेकडून दि.08 मार्च 2020 रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला असुन सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ॲड.ज्योतीताई बाजड होत्या.

त्यांनी महिलांना कायदेविषयक अधिकार सांगितले तसेच कापडी पिशवीच्या संचालिका सौ. कल्याणी रूपेश गढवाले यांनी प्लास्टिक बंदी वर उपाय व महिलांना या माध्यमातून कसा रोजगार मिळेल? या विषयी माहिती सांगितली.तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सीमा तांबोळकर मॅडम, संगीत शिक्षीका सौ स्नेहल साधू मॅडम, संस्थेच्या अध्यक्षा कु.पुनमताई बंग व नगर सेविका सौ.अघमताई उपस्थित होत्या.तसेच ध्यास संस्थेच्या माध्यमातून पिडीत महिलांकरिता महिला स्वाभिमान केंद्र चालवण्यात येईल त्यांच्या संचालिका कु.श्रृतिका राऊत यांनीत्याबद्दल मार्गदर्शन केले.महिलांमध्ये सॅनेटरी नॅपकिन साठी जनजागृती करण्यात आली आणि लवकरच ध्यास संस्थेकडून 100% विघटनशील नॅपकीनची निर्मीती कारंजा शहरात होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.. असे सांगण्यात आले. उपस्थित सर्व महिलांना प्लास्टिक बंदी वर पर्याय म्हणून कापडी पिशवी देण्यात आली कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या सचिव कु. रोशनी रेवाळे यांनी केले.अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला..