Home जळगाव दे के अपनी कोम को मै एक इशारा दे जाऊंगा ।

दे के अपनी कोम को मै एक इशारा दे जाऊंगा ।

33
0

या शायरी ने धरणे आंदोलनास सुरवात.

धरणे आंदोलन व सांस्कृतिक निषेध

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय जनसंख्या नोंदणी ला विरोध म्हणून धरणे आंदोलनाचा बुधवार हा ७० वा दिवस या दिवशी जळगाव तालुक्यातील सामाजिक संघटना व शैक्षणिक संघटनेतील कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
या धरणे आंदोलनाची सुरुवात खलील अहमद खलील यांच्या पवित्र कुराण पठनाने होऊन सांगता अल्ताफ शेख यांच्या दुवा ने करण्यात आली.

*धरणे आंदोलन व सांस्कृतिक निषेध*

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शायर रागीब ब्यावली यांनी आंदोलनस्थळी या कायद्याला विरोध म्हणून तसेच या कायद्याच्या समर्थनार्थ येणाऱ्या लोकांना उद्देशून अत्यंत धारदार कविता सादर केल्या त्यातील एक चार लाईन ची शायरी ने दाद मिळवून दिली व यास तीन वेळा वन्स मोर मिळाला ती अशी
* दे के अपनी कौम को मै एक इशारा जाऊंगा,
आज वोह सुली चढा, कल मै पुकारा जाऊंगा
मीर सादिक जब तलक है जिंदा मेरी कोम में
मैं अगर टीपू भी बन जाऊ तो मारा जाउगा।
त्यांनी अजून भारताशी इमाने इतबारे कार्यरत असणाऱ्या मुस्लिमांच्या युतीबाबत सुद्धा छान अशी शायरी सादर केली.

*यांनी सादर केले आपले मनोगत*
फारुक शेख, करीम सालार, अल्ताफ शेख ,सौ रुबीना शेख, सौ मोनिसा फातेमा साबीर, असलम पठाण, फरहान सय्यद इक्बाल शेख ,अकील खान यांनी मार्गदर्शन केले.
*यावेळी विशेष उपस्थिती*
प्रोफेसर डॉक्टर इक्बाल शाह, आसिफ देशपांडे, इक्बाल वजीर, ज्येष्ठ पत्रकार रशीद कासमी, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, मुजफ्फर खान सर, मोहम्मद रफीक गुलाम रसूल, सलीम रेडिएटर ,

*दोन शिष्टमंडळांनी दिले निवेदन*
दहा मार्च रोजी सूटी असल्याने निवेदन देता आले नव्हते ते आज जुबेदा बी सय्यद चाँद यांच्या नेतृत्वात शमशाद बी शेख हुसेन, शमीना बी शेख कासम, हसीना बी शेख मुख्तार, कुलसुम बी शेख ईसा, मोईजा फ़ातेमा सय्यद यांनी
तर ११ मार्च चे निवेदन करीम सालार यांच्या नेतृत्वात गुलाम नबी बागवान, अब्दुल हक पटेल, शेख उस्मान, सय्यद हसन सय्यद कादर, शकील करीम बागवान, शेख शफी शेख सलाम खाटीक यांनी उपजिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार विकास लाडवंजारी यांना सुपूर्द केले.

Unlimited Reseller Hosting