Home मराठवाडा ग्रामीण भागातील महिलांनी सुकन्या समृध्दी खात्याचा लाभ घ्यावा – सुरेश सिंगेवार

ग्रामीण भागातील महिलांनी सुकन्या समृध्दी खात्याचा लाभ घ्यावा – सुरेश सिंगेवार

42
0

नांदेड , दि. १२ :- दि.११ रोजी माळकोठा मुदखेड येथे नांदेड डाक विभागाच्या वतीने मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृद्धि खाते योजना जनतेच्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना मार्केटिंग एक्सएटिव्ह सुरेश सिंगेवार म्हणाले की ही भारत सरकार ची योजना आहे. ही योजना शून्य ते दहा वर्षा पर्येंतच्या मुलींसाठी आहे. ग्रामीण भागातील मुलीच्या आई-वडिलांना या योजनांची माहिती अपुरी मिळाली आहे.त्यांना सुकन्या समृध्दी खात्याची माहीत मिळावी यांचा प्रचार व प्रसार व्हावा.या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या मुलींचे सुकन्या समृध्दी योजनाचा लाभ घ्यावा. असे सुरेश सिंगेवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना सुरेश सिंगेवार म्हणाले की या योजनेला सुरुवात होऊन सहा वर्षे झाली आहे या योजनेला मोठा प्रतिसाद गावा-गावात मिळत आहे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मालाकोठा येथील शाखा डाक पाल गाढे हे उपस्थित होते. उपस्थित होते.
या मेळाव्यात एकशे दहा मुलीच्या आई व वडिलांनी भाग घेऊन आपल्या मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते योजनेत भाग घेतला असल्याचे सिंगेवार यांनी सांगितले.

Unlimited Reseller Hosting