Home उत्तर महाराष्ट्र प्रहार च्या दणक्याने संजय गांधी निराधार योजना कार्यालय हादरले…!

प्रहार च्या दणक्याने संजय गांधी निराधार योजना कार्यालय हादरले…!

27
0

प्रहारची वज्रमुठ एकवटली…!

राज्यमंत्री ना. बच्चु भाऊ कडु यांचा आदेशानुसार प्रहार चे आजी माजी पदाधिकारी एकवटले….!!

प्रहार जनशक्ती पक्षाचेनाशिक जिल्हाध्यक्ष श्री आनिल भाऊ भडांगे व प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक चे शहराध्यक्ष श्री ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री भगवान डोईफोडे यांना दिव्यांग, विधवा, निराधार महिला यांचे समस्या विषयी निवेदन देण्यात आले, जिल्हाधिकारी कार्यालयात रॅम्प ची सुविधा नसल्याने उपजिल्हाधिकारी श्री भगवान डोईफोडे यांनी स्वता खाली येऊन निवेदन स्विकारले, व दिव्यांग व्यक्ती च्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर प्रहारच्या पदाधिकारी यांनी संजय गांधी निराधार योजना कार्यालयाकडे मोर्चा वळवला, अनेक दिव्यांग व्यक्ती नी जिल्हाध्यक्ष श्री आनिल भाऊ भडांगे यांच्या कडे तक्रारी केल्याने आज कार्यालयातील आधिकारी व कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले, पैशाची मागणी करणे, असभ्य वर्तन करणे, शासकीय अनुदान येऊनही वेळेवर लाभार्थी यांचे खात्यात जमा न करणे, नवीन प्रकरण लवकर पडताळणी न करणे, दिव्यांग व्यक्ती ना अपमानास्पद वागणूक देणे अशा अनेक तक्रारी प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक यांच्या कडे प्राप्त झाल्यावर आज प्रहार करण्यात आला.

या प्रसंगी कार्याध्यक्ष श्री बबलु मिर्झा, शहराध्यक्ष श्री ललित पवार, जिल्हाध्यक्ष श्री आनिल भाऊ भडांगे , महीलाध्यक्षा संध्याताई जाधव, सचिव श्री पंकज सुर्यवंशी, शहर उपाध्यक्ष श्री रुपेश परदेशी , दिव्यांग शक्ती नाशिकचे उपअध्यक्ष श्री विनायक कस्तुरे ,
श्री क्षितिज क्षत्रिय, श्री जयंत पिंपळे , सारिका नागरे कल्पेश करंजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting