Home मराठवाडा नांदेड जिल्हा दक्षता समिती व नांदेड जिल्हा पोलिस दला तर्फे ८ मार्च...

नांदेड जिल्हा दक्षता समिती व नांदेड जिल्हा पोलिस दला तर्फे ८ मार्च जागतिक माहिला दिना निमित्य आयोजित “निर्भया वाॕक” ला नांदेडकरांनी दिले उत्स्फुर्त प्रतिसाद

42
0

नांदेड , दि.९ – ( राजेश भांगे )-
महिला वरील अत्याचार व मुलींचे होते असलेले शोषन, अपहरण छेडछाड व प्रेम प्रकरणांतुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीवर होत असलेले प्राण घातक हल्ले लक्षात घेऊन अशा घटनांना आळा घालण्या करीता पोलिसां बरोबर निर्भया वाॕक या आयोजित कार्यक्रमा मध्ये जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाच्या द्रष्टीकोनातुन जिल्हा महिला दक्षता समिती व महिला संघटनांनी अवाहन केले होते.

केलेल्या अव्हानास यावेळी नांदेड च्या जनतेने मोठ्या प्रमाणात हजेरी लावुन उत्स्फुर्त पणे प्रतिसाद दिला. तरी निर्भया वाॕक या कार्यक्रमासाठी विविध भागातुन १८०० ते २००० महिला , पुरूष व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन दि.८ मार्च २०२० रोजी सकाळी ७ वा. निर्भया वाॕक या आयोजित कार्यक्रमास महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष नांदेड मा.श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकरि नांदेड डाॕ. श्री. विपीन इटनकर , पोलिस अधिक्षक नांदेड श्री विजयकुमार मगर, मुख्यकार्यकारी अधिकारी जि,प. नांदेड श्री अशोक काकडे , महिला दक्षता समितीच्या डाॕ. विद्या पाटील , श्रीमति सुरेखा रावणगांवकर , श्रीमती प्रकाश कौर खालसा , श्रीमती कल्पना डोंगळीकर व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यावेळी अभिवादन केले व जिल्हाधिकारी डाॕ.विपीन इटनकर नांदेड यांनी हिरवा झेंडा दाखवुन पोलिस बँडच्या राष्ट्रगिताच्या गजरात महिला दंगा नियत्क पथक, दामिनी पथक , महिला जिल्हा सुरक्षा पथक , शालेय मुले , मुली व महाविद्यालयीन विद्यार्थी सर्व महिला संघटना व इतर जनते सह निर्भया वाॕकला सुरवात करण्यात आली. निर्भया वाॕक शिवाजी नगर मार्गे निघुन महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन करून पोलिस स्टेशन वजिराबाद येथे पोहचले व तिथे विविध कार्यक्रम ठेवण्याण आले होते. सदर कार्यक्रमात पोलिस अधिक्षक श्री विजयकुमार मगर यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती देऊन जिल्हा दक्षता महिला समिती नांदेड पोलिस दला तर्फे महिला सक्षमिकरण व महिला सुरक्षेसाठी केलेल्या उपाय योजनां बाबद इत्यंभुत संपुर्ण माहिती देऊन सदर योजना या प्रमाणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
१. दामिनि पथक. (२). पोलिस दिदि पोलिस काका पथक. (३) पी.सी.आर पथक. (४) महिला दंगा नियंत्रण पथक. (५ ) जिल्हा महिला सुरक्षा पथक. (६ ) महिलांसाठी हेल्प लाईन क्रमांक १०९१. (७ ) चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक १०९८. (८ ) पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना परिपत्रक. (९ ) महिला प्रशिक्षण .(१०) जिल्हा महिला सुरक्षा समिती .(११ ) सायबर सेल. (१२ ) नांदेड शहरातील पोलिस चौकी . (१३ ) पोलिस अधिकाऱ्यांना तंत्रशुद्ध तपास विषयक प्रशिक्षण. (१४ ) पोलिस अधिक्षक कार्यालय निर्भया व्हाटस अॕप ग्रुप. (१६ ) व सुरक्षा पेन. यावेळी मा.श्री अशोकराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री नांदेड जिल्हा, यांच्या हस्ते सुरक्षा पेन चे अनावरण करण्यात आले. व महिलांवरील होणारे अत्याचारांवर आळा बसविणेकामी व जनते मध्ये जनजाग्रती होणेकामी पटनाटय सादर करण्यात आले. या कार्यक्रमास मा.श्रीमती मंगारानी अंबुलगेकर (जि.प अध्यक्ष नांदेड) , मा.श्री अमरनाथ राजुरकर (विधान परिषद सदस्य) , मा.श्री मोहन हंबर्डे (आमदार विधानसभा नांदेड दक्षिण) , मा.स्वाती चव्हाण (न्यायधिश कौटुंबिक न्यायालय नांदेड ), मा.सतिश देशमुख (उपमहापौर म.न.पा. नांदेड ) मा.डि.पी.सावंत ( मा.राज्य मंत्री ), मा.अशोक काकडे ( भ्रा.प्र.से. मुख्यकार्यकारी अधिकारी जि,प.नांदेड ), मा.श्री डाॕ. उध्दव भोसले ( कुलगुरू स्वा.रा.ती.वि.नांदेड ) यांच्या सह आदि अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

Unlimited Reseller Hosting