अमीन शाह
नांदेड , दि. ०९ :- वेडसर मातेने स्वतः च्या चिमुकल्याचा गळा आवळून खून करून मृतदेह घाण पाण्यात फेकून दिल्याची घटना 5 मार्च रोजी उघडकीस आली.याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी माते विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मालटेकडी परिसरातील रेल्वे पुलाखाली एका बालकाचा मृतदेह असल्याची माहिती 5 मार्च रोजी पोलिसांना मिळाली होती, या माहितीवरून विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदर घटना स्पष्ट झाली.परंतु सदर बालक कोण आहे याची चौकशी सुरू झाली. दरम्यान याबाबत मयत चिमुकल्याचा पिता राहुल गहुबळे रा .अंदेगाव ता.हिमायतनगर ह.मु. नांदेड यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली.
यामध्ये मयताची माता कांचन गहुबळे हिने स्वतः चा मुलगा दिवेश (3)याचा 5 मार्च पूर्वी वेडयाच्या भरात गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह रेल्वे पुलाखाली घाण पाण्यात फेकून दिल्याचे म्हटले आहे.याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोनि ननावरे हे करित आहेत.
