Home मराठवाडा अन , ती झाली एक दिवसाची ठाणेदार

अन , ती झाली एक दिवसाची ठाणेदार

153

शिरीहरी अंभोरे पाटील

हिंगोली , दि. ०९ :- आपण नायक चित्रपट पाहिलाच असेन, त्या चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता पण आपल्या हिंगोली जील्ह्यात प्रत्यक्ष जागतिक महिला दिना निमत्त एक दिवसाचा पोलीस निरीक्षक होण्याचा मान कु.किरण शेकुराव सोनार ,दंत चिकित्सक विद्यार्थिनी, हिंगोली (BDS) यांना देण्यात आला,
या वेळी श्री. ए. आय. सय्यद पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगोली शहर यांनी आपल्या पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार कु. किरण शेकुराव सोनार यांना देऊन हिंगोली शहरात प्रथमच जागतिक महिला दिना निमित्त उपक्रम राबून हिंगोली जिल्ह्याची मान उंचावेल असे कार्य केले.कु. किरण शेकुराव सोनार हिने भविष्यात आपल्याला आयएएस अधिकारी बनून लोकांची सेवा करायची आहे असे मत व्यक्त केले.. यावेळेस पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, निर्भया पथकातील स्त्रिया व इतर महिला उपस्थित होत्या त्यांनी हिंगोलीत असा प्रथमच कार्यक्रम घेतला असून पहिला मान गोपाळ समाजाच्या मुलीला मिळाला असे वक्तव्य केले व तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कु.मिरा बामणीकर निर्भया, पोलीस दीदी, दामिनी पथक प्रमुख असुन यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.ठाणे अंमलदार मपोना गंगा सूर्यवंशी, सुरेखा आत्राम तसेच सीसीटीएनएस महिला पोलीस कॉन्स्टेबल हिना चव्हाण व वायरलेस ड्युटी कामी सविता ससाने अस्मिता उदगिरे यांनी ड्युटी पाहिली
सदरचे कार्यक्रमास पोलीस स्टेशनच्या महिला ज्योती जोंधळे सुरेखा कल्याणकर नंदा धोंगडे ज्योती सूर्यतळ वर्षा मुळे हजर होत्या. कार्यक्रमासाठी जया कर्डेकर,योगा टीचर शितल तापडिया, यशोदाताई कोरडे, रक्षा बगडिया ,स्नेहा वाघमारे ,कोंडावार, रजनी पाटील, रेखा पाटील, शांताबाई मोरे, सविता बोरकर ,संजीवनी मस्के आदींचे सहकार्य लाभले.