
‘ प्रबोधन सामाजिक बहुद्देशीय संस्थाचें अध्यक्ष गणेश शिंदे याचा उपक्रम ‘
निखिल मोर
पाचोरा – महिलांचा सन्मान करा, महिलांचे रक्षण करा त्यांना न्याय द्या चांगली वागणूक द्या अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराज व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिली आहे. ही शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे. तिचे पालन केले पाहिजे. त्यामुळेच आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे. त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली पाहिजे, असे आवाहन प्रबोधन सामाजिक बहुद्देशीय संस्थाचें अध्यक्ष गणेश शिंदे यांनी केले.महिलांचा सन्मान म्हणून दरवर्षी विविध संकल्पना राबवून जागतिक महिला दिन साजरा केला जात असतो ,त्याचे औचित्य साधून या वर्षी शहरातील प्रबोधन सामाजिक बहुद्देशीय संस्था व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त सामाजिक प्रबोधन करण्यासाठी सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून बिकट परिस्थिती वर मात करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे ग्रामीण व शहर परिसरातील कष्टकरी, शेतमजुरी करणाºया गोरबरीब अशा ५ कामगार महिलांचा आज ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिव मंदिरात प्रबोधन सामाजिक बहुद्देशीय संस्थाचें अध्यक्ष गणेश शिंदे व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण आबा सुर्यवंशी विश्व मराठा संघ जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील डोगरगाव ग्रामपंचायत सरपंच पंढरीनाथ पाटील हस्ते साडीचोडी व गुलाबगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक सचिन पाटील वीर विश्व मराठा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील संभाजी बिग्रेडचे कार्याध्यक्ष मुकेश तुपे रिक्षा युनियनचे उपाध्यक्ष सुधाकर महाजन रवी ठाकूर अनिल भोई धीरज खुशवहा रोशन सावळे पपु जाधव दीपक महाजन हे उपस्थित होते.