सातारा

होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात.

Advertisements

लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उस्तुकता असते.

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. ह्या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते या मागे एक आख्यायिका आहे.

राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हाद ला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयन्त केला , पण प्रळाडणे नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

शेवटी हिरण्यकश्यप राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहिण होळीका ची मदत घेतली. होळीकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला. परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळीका भस्म झाली.

या कथेमधून हा संकेत मिळतो कि वाईटावर चांगल्याच विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगाचा सण आहे.

या सणाची लहान मुले आतुरतेने वाट पहात असतात. या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते.

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.

होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.
“होळी रे होळी पुरणाची पोळी” ..
किंवा “होळीला गवऱ्या पाच पाच… डोक्यावर नाच नाच”.

लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात.

जे जुनं आहे, कालबाह्य आहे , अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्तते चा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.
होळीच्या पवित्र अग्निमध्ये , निराशा , दारिद्र्य , आळस यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद , सुख , आरोग्य अाणि शांति नांदो. होळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक
सतीश वसंतराव डोंगरे मायणी ता.खटाव जि.सातारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ खटाव तालुका अध्यक्ष ,पत्रकार ,फोटोग्राफर

You may also like

सातारा

मायणी परिसरात नाविन्यपूर्ण फुलपाखरुंची उपस्थिती , “राज्य फुलपाखरू ‘नीलवंत’ सह सुंदर बटरफ्लाय ची गर्दी”

सतीश डोंगरे मायणी , दि .३- ता.खटाव. जि.सातारा – सभोवतालच्या कोरोना वातावरणात मायणी नगरीत ‘वन्यजीव ...
सातारा

पत्रकार दै.ललकारचे राजेश जाधव यांना “राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार” जाहीर

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांचेवतीने होणार पुरस्काराचे वितरण मायणी / सातारा – विटा ...
सातारा

मायणीत उभारलेले ऑक्सिजन सेंटर खरोखरच कौतुकास्पद – प्रांत अश्विनी जिरंगे

कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करणे गरजेचे अशा दानशूर व्यक्तीचे कौतुक प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे  ...
सातारा

सातारा जिल्ह्यातील 143 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु

सातारा – प्रतिनिधी जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 143 जणांचे अहवाल ...
सातारा

सातारा जिल्ह्यातील 168 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित , 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

सातारा / प्रतिनिधी – जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 168 जणांचे ...
सातारा

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ ज्योतिर्विद ज्योतिषालंकार श्रीयुत श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे निधन

सतीश डोंगरे मायणी / सातारा :- अभ्यासक्रमाच्या शिस्तीतून, विज्ञानाच्या भूमिकेतून व एका शास्त्रीय चौकटीतून ज्योतिष्याची ...