Home मराठवाडा प्रधानमंत्री पिक विमा योजना , कमी मदत मिळालेल्या मंडळांना अधीक मदत मिळवून...

प्रधानमंत्री पिक विमा योजना , कमी मदत मिळालेल्या मंडळांना अधीक मदत मिळवून दयावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

33
0

नांदेड , दि. ०९ ( राजेश भांगे ) –
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत कमी मदत मिळालेल्या मंडळांना अधीक मदत मिळवून दयावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेसंबंधी आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्यालात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०१९ मध्ये सोयाबीन या पिकामध्ये मंडळ निहाय कमी अधिक मदत मिळाली आहे. काही मंडळात प्रत्येकी हेक्टरी मदत कमी मिळाल्याचे दिसून आले आहे. भोकर तालुक्यात भोकर, मोघाळी, किनी, मातूळ या चार महसूल मंडळापैकी मोघाळी व किनी महसूल मंडळात कमी रक्कम मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये या प्रकारची तफावत दिसून आली. कमी मदत मिळालेल्या मंडळांना अधिक मदत मिळून देण्याबाबत भारतीय कृषि विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कदम यांना यावेळी सुचना दिल्या.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून तफावत दूर करावी. वाढीव निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी कृषी सचिव यांना पाठवावा. यासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे कृषि मंत्री, कृषि सचिव, कृषि आयुक्त व विमा कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.
पीक विमा नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना मिळालेल्या रक्कमेतून बँकांनी कर्जाच्या रक्कमेची कपात करुन नये असे पत्र सर्व बँकांना देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांना यावेळी सुचना दिल्या.
आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, भोकरचे तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कदम आदींची यावेळी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting