Home मराठवाडा बिडकीन पोलिस ठाणे यांच्या वतीने अवैध गुटख्यावर कार्यवाही

बिडकीन पोलिस ठाणे यांच्या वतीने अवैध गुटख्यावर कार्यवाही

345
0

बिडकीन – रविंद्र गायकवाड

औरंगाबाद , दि. ०९ :- पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस स्टेशनच्या हद्दीत मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक, गोरख भामरे साहेब, (IPS ), व मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजेंद्र बनसोडे यांना मिळालेल्या माहिती प्रमाणे साहेबांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक, भागवत मुठाळ, प्रशांत मुंडे व पोलीस कर्मचारी राहुल बल्लाळ यांनी रांजणगाव रोड, मदिना मज्जीत जवळ, कल्याण नगर, बिडकीन, ता. पैठण येथे अस्लम हनिफ पठाण, वय- 32 वर्षे, रा. कल्याण नगर, बिडकीन, ता. पैठण याचे ताब्यातून वाहन क्र. MH-20/CT- 4968 सह महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ ( गुटखा व सुगंधित तंबाखू ) असा एकूण 2,93, 760 /- रु. चा जप्त केला आहे.
मा.ज्योस्ना जाधव, निरीक्षक, अन्न व औषध विभाग यांचे फिर्याद वरून दाखल झाला आहे, पुढिल तपास मा. पो.स्टे. प्रभारी अधिकारी, राजेंद्र बनसोडे साहेब यांचे मार्गदर्शन खाली प्रशांत मुंडे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस स्टेशन बिडकीन हे करत आहेत.