Home जळगाव पाचोरा तालुका शिवसेनेच्यावतीने शेतकरी राजाच्या मदतीसाठी बायोमेट्रिक चे उदघाटन !

पाचोरा तालुका शिवसेनेच्यावतीने शेतकरी राजाच्या मदतीसाठी बायोमेट्रिक चे उदघाटन !

180

निखिल मोर

पाचोरा – महाराष्ट्र राज्यातील मा.ना. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाआघाडीच्या शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना १००% पारदर्शकपणे, सुलभ, सोपी पद्धतीने राबविली असून, त्यामध्ये शेतकरी राजाचे फक्त आधारकार्ड प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. म्हणून पाचोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथील शिवसेना कार्यालय येथे आपले आमदार सेतू सुविधा केंद्रांचे उद्धघाटन रावसाहेब पाटील जि.प.सदस्य व गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांच्या शुभहस्ते दि.६/३/२०२० शनिवार रोजी दु.१ वा करण्यात आले.

सर्व शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीच्या संदर्भात आधारकार्ड प्रमाणीकरण करणे व इतर समस्या अडचणी असल्यास त्या सोडविण्याबाबत पाचोरा येथील शिवसेना कार्यालय येथे मदत मिळेल. शिवसेना वचनपूर्ती कर्जमुक्ती सोहळा मा.ना. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे होत असल्यामुळे बळीराजा आनंद व्यक्त करीत आहे. यावेळी लाभार्थी शेतकरी बांधवांनी प्रतिक्रिया देखील दिल्यात. शासनाचे आभार देखील व्यक्त केले.
यावेळी रावसाहेब पाटील जि.प.सदस्य, पदमसिंग पाटील जि.प.सदस्य, गणेश पाटील शिवेसना उपजिल्हाप्रमुख, मनोज आप्पा, बापू हटकर, नाना वाघ, जावेद शेख, रवींद्र पाटील, भाऊसाहेब पाटील,प्रवीण पाटील, भागवत काळे, संतोष पाटील,विजय भोई, दीपक पाटील, नितीन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.