Home सोलापुर के  पी गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने १०१ महिलाना साड्या वाटप.

के  पी गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने १०१ महिलाना साड्या वाटप.

503

जीप चालक मालकाना एक लाख रू ची मोफत विमा संरक्षण .

सामाजिक क्षेत्रत उत्कृष्ठ काम केलेल्या मान्यवराचे सन्मान

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येेेेथे के पी गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने १०१ गरीब महिलाना साड्या ,जीप चालक मालक यांची मोफत विमा पाँलिसी व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणा-या व्यक्तींचा सन्मान पत्र देवुन विशेष सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात व वैभवपूर्ण वातावरण संपन्न झाला.
के पी गायकवाड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक देवेंद्र राठोड होते.शोभाबाई गायकवाड ,अविनाश मडिखांबे ,गुंडप्पा पोमाजी विरोधी पक्ष नेते,रा स प जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगार ,माजी सरपंच रवी वरनाळे ,लक्ष्मण हुग्गे,रतन बंगरगी ,आरिफ अन्सारी ,शंकर राठोड ,लक्ष्मीबाई पोमाजी,विमलाबाई पोमाजी,संतोष पोमाजी ,सुनिल सावंत ,राजकुमार यादव ,शाम बाबर ,कमलाकर सोनकाबंळे ,प्रकाश पोमाजी ,महानंदा पोमाजी शैलाबाई मुनोळी,जयश्री नंदर्गी ,गंगुबाई बिराजदार,भटारे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मोतोश्री शोभाबाई गायकवाड यांच्या हस्ते परमेश्वर व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . तर राहुल गायवाड यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उध्दघाटन झाले. बहुजन महाराष्ट्र न्युज चे संपादक कमलाकर सोनकांबळे यांनी प्रस्ताविकात प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमाबध्द माहिती दिली . यावेळी प्रा. राहुल रूही , गौतम बाळशंकर , अविनाश मडिखांबे , सुनिल बंडगार यांनी के पी गायकवाड प्रतिष्ठाचे कार्य अनुकरिण व स्तुत्य असल्याचे स्पष्ठ केले.