Home मराठवाडा औरंगाबाद येथे करोना चा संशयित रुग्ण सापडला..!

औरंगाबाद येथे करोना चा संशयित रुग्ण सापडला..!

29
0

घाटीत उपचार सुरू

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०७ :- चीनसह जगभरात धुमाकुळ घालणा-या करोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून एक रूग्ण आज शनिवारी घाटी रूग्णालयात दाखल झाला. करोनाचा संशयीत रूग्ण असल्याचे समजताच घाटी रूग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान , दाखल झालेला रूग्ण हा संशयीत असल्याने त्याच्या विविध चाचण्या करण्यात येत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रहिवासी असलेला एक रूग्ण शनिवारी दुपारी घाटी रूग्णालयात दाखल झाला. दाखल झालेल्या रूग्णाला करोना विषाणूची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. घाटीत करोना बाधीत रूग्ण दाखल झाला असल्याचे समजताच घाटी रूग्णालयात एकच खळबळ माजली होती. घाटीच्या मेडिसीन विभाग तातडीने रिकामा करण्यात येवून संशयीत रूग्णाला दाखल करण्यात आले. दाखल झालेल्या रूग्णाच्या विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येत असून त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, घाटी प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात येत नसल्याने करोनाबाधीत रूग्णाचे गुढ वाढले आहे.

Unlimited Reseller Hosting