Home विदर्भ राष्ट्रीयकृत बँकेसाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन

राष्ट्रीयकृत बँकेसाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन

15
0

मनोज गोरे

कोरपना – या तालुका स्थानी राष्ट्रीयकृत बँकेत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार कोरपना यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आले.
कोरपना हे तालुक्याचे स्थळ असून येथे विविध शासकीय-निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, बाजार पेठ आहे. त्यामुळे येथील दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी, नागरिक यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. मात्र येथे राष्ट्रीय कृत बँक नसल्याने वन सडी किंवा गडचांदूर येथे जाऊन आपली कामे नागरिकांना करावी लागते आहे.यात वेळ व आर्थिक भुर्दंड विनाकारण सोसावी लागते. जिल्ह्यात सर्व तालुका स्थानी राष्ट्रीयकृत बँक आहे. परंतु कोरपना व जिवती येथेच बँक नाही.
येथेही सोय नागरिकांची अडचण दूर होईल.निवेदन देतेवेळी कोरपना तालुका बार असोसिएशनचे सचिव अड. श्रीनिवास मुसळे, अड पवन मोहितकर, नगरसेवक सुभाष तुरानकर, अमोल आसेकर, शशिकांत आडकिणे, आशिष ताजने, भाऊराव ठावरी, अनिल कवरासे, गजानन भोंगळे आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.