Home जळगाव भुसावळात रेल्वे सरव्यवस्थापकांनी केली पीओएच कारखान्याची पाहणी

भुसावळात रेल्वे सरव्यवस्थापकांनी केली पीओएच कारखान्याची पाहणी

40
0

लियाकत शाह

भुसावळ , दि. ०७ – मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांचे शुक्रवारी पहाटे भुसावळात आगमन झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली. रेल्वे स्थानक परीसरात सकाळी १० वाजता नाटिका सादर करण्यात आली तसेच त्यानंतर त्यांनी रेल्वे विद्युत इंजीन कारखान्याचे पीओएच तसेच वर्कशॉपचे निरीक्षण केले. दरम्यान, दुपारी तीन वाजता मित्तल हे मालगाडीचे परीक्षण केंद्रात निरीक्षण करतील तसेच दुपारी ३.३० वाजता रेल्वेच्या झेडटीएसला भेट देऊन तेथे पाहणी करणार आहे तसेच सायंकाळी ५.४५ वाजता नवीन पादचारी पूलाचे आरओएच डेपोजवळ उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. यावेळी डीआरएम विवेककुमार गुप्ता तसेच रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting