Home मराठवाडा अहिल्यादेवी शिवाय देशाचा इतिहास अपूर्णच – सखाराम बोबडे

अहिल्यादेवी शिवाय देशाचा इतिहास अपूर्णच – सखाराम बोबडे

93
0

परभणी / गंगाखेड- राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवा या देशाचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही असे असतानाही सत्ताधारयाकडुन मात्र जाणून-बुजून होळकरांचा इतिहास लपविण्याचे काम होत असल्याची टीका धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा ऊमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली.

ते शुक्रवारी (ता 6 )गंगाखेड येथे आयोजित सोलापूर विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ नेते वैजधाथदादा भंडारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धनेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक हरिश्चंद साबळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना बोबडे म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांचं महान कार्य लपविण्याचा, बाजूला सारण्याचा प्रयत्न सरकार कडून केला जातोय. मागच्या सरकारने जाता- जाता सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन नामविस्तार केला. ही अभिमानाची बाब असली तरी धनगर समाजाचा समस्येचे मूळ हे एस टी आरक्षण मिळाल्याशिवाय सुटणार नाही. धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी आगामी काळात समाजाने एकत्र येऊन मोठा लढा उभारावा व दुसऱ्या बाजूला मा मधु शिंदे याच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन लढासाठी सर्व ताकदीनिशी भरीव मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सदाशिव कुंडगीर, मसनेरवाडीचे माजी सरपंच जयदेव मिसे, वाघलगावचे सरपंच नारायणराव घनवटे, अशोकराव गाढवे, भाऊसाहेब कुकडे, समाधान सलगर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश भाऊ खवडे, आशिष बोबडे अहिलाजी भुसनर यांनी प्रयत्न केले.

Previous articleकिनवट वनपरिक्षेत्र अंतर्गत कोठारी शिवारात वनविभागाच्या पथकाची कार्यवाही.
Next articleराष्ट्रीयकृत बँकेसाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here