Home मराठवाडा किनवट वनपरिक्षेत्र अंतर्गत कोठारी शिवारात वनविभागाच्या पथकाची कार्यवाही.

किनवट वनपरिक्षेत्र अंतर्गत कोठारी शिवारात वनविभागाच्या पथकाची कार्यवाही.

462

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०७ :- किनवट वनपरिक्षेत्र अंतर्गत कोठारी शिवारात वनविभागाच्या पथकाने गुप्त माहिती च्या आधारे संशयित ओटोचा पाटलाग केले असता वन तस्करांनी अंधाराचा फायदा घेऊन अॅटोतील अवैध सागवानाचा कट साईज माल टाकून पळ काढला . सदरील कारवाई दि . ०६ रोजी सायं .सहा वाजता घडली .यावेळी वनविभागाने कट साईज सागवानाचे एकूण 55 नग घ .मी . 0.1517 मालाची अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये जप्त करण्यात यश मिळविले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कोठारी शिवारात आँटो चा पाठलाग केला असता, वन तस्करांनी अंधाराचा फायदा घेऊन अॅटोतील अवैध सागवान माल टाकून पळून गेलेत . घटनास्थळावरून वन विभागाच्या पथकाने 55 सागवानाचे कट साईज नग घ.मी .0.1517 ज्याची किमंत 15000 इतका माल जप्त करून अज्ञात तस्करा विरुद्ध वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे .
सदरील कार्यवाही सहावनसंरक्षक वि .जी.गायकवाड , वनपरिक्षेञ अधिकारी के .एन.खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के.जी. गायकवाड , सोनकांबळे , सांगळे, मंजाळकर , वनरक्षक संभाजी घोरबांड, सारगे ,रवी दांडेगावकर, वाहन चालक बि. व्ही आवले, बी. टी.भुतनर, वनमजूर भावसिंग, सातव, गरड,फारुख, यांचा सहभाग होता.