Home उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत केऱ्हाळे बु. तालुका रावेर येथील कुमारी आसमा...

नाशिक विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत केऱ्हाळे बु. तालुका रावेर येथील कुमारी आसमा तडवी हीने प्रथम क्रमांक पटकावला

32
0

रावेर ( शरीफ शेख )

जळगाव , दि. ०७ :- नाशिक येथे दिनांक ५ मार्च २०२० रोजी पार पडलेल्या नाशिक विभाग स्तरीय गो गर्ल गाे स्पर्धेत केऱ्हाळे बु. येथील जि प प्राथमिक शाळा नंबर 2 या शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी आसमा मोहम्मद तडवी या विद्यार्थीनीने 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे ती केर्‍हाळे बुद्रुक येथीलश्री मोहम्मद तडवी व सायरा तडवी यांची कन्या आहे.
या स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या कुमारी आसमा तडवी हिची राज्यस्तरावर निवड करण्यात आलेली आहे या स्पर्धेत तिला प्रोत्साहित करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र तायडे वर्गशिक्षक श्री शांताराम विचवे श्री मधुकर निळे श्री साहेबराव चौधरी श्री योगेश पाटील श्री दिलीप सावळे तसेच रावेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री अजित तडवी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री नवाज तडवी साहेब केंद्रप्रमुख श्री प्रभाकर बोंडे श्री मानकर सर क्रीडाशिक्षक श्री ए पी पाटील सर यांनी सखोल मार्गदर्शन केले.

Unlimited Reseller Hosting