Home महत्वाची बातमी कोरपनाची रुनाली गायणार आकाशवाणीवर

कोरपनाची रुनाली गायणार आकाशवाणीवर

51
0

कोरपना – मनोज गोरे

– जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोरपना वर्ग सातची विद्यार्थीनी रुनाली मेघराज हरबडे ही आकाशवाणी, चंद्रपूर च्या बालगीत सदरात गीत गायन करणार आहे. या तिने पाच गीते गायली असून त्याची रेकॉर्डिंग नुकतीच झाली आहे. त्याचे प्रसारण दिनाक 19 एप्रिल ला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून साडेआठ वाजता होणार आहे. याबद्दल तिचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक एन के जाधव व शिक्षकानी अभिनंदन केले.