महत्वाची बातमी

प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पोलीस ठाणे महिला पोलीस ठाणे ????

अमीन शाह

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पोलीस ठाणे महिला पोलीस ठाणे असणार आहे. या ठिकाणचे सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असतील. या पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणचे महिलांविषयक गुन्हा दाखल करता येईल. अर्थसंकल्पात ही घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
पोलीस दलात आजही महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात व पोलीस आयुक्तालयात किमान २ ते ३ पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी महिला अधिकार्‍यांची नेमणूक करावी असा आदेश काढला होता. ते गृहमंत्री असताना काही ठिकाणी याची अंमलबजावणी झाली होती. त्यानंतर या आदेशाकडे घटक प्रमुखांनी दुर्लक्ष केले. अगदी महिला पोलीस अधिकारी घटक प्रमुख असतानाही या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
आज अनेक जिल्ह्यात तसेच पुणे शहरात या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या घोषणेचे पोलीस दलातून कसे स्वागत होते, याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You may also like

महत्वाची बातमी

मक्का शरीफ मे आज जोरदार बारीश हुई हो रही इस बारीश का बहेतरिन विडिओ हमे मक्का शरीफ से प्राप्त हुवा है 

पवित्र मक्का शरीफ मे आज जोरदार बारीश हुई हो रही इस बारीश का बहेतरिन विडिओ ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...