Home महत्वाची बातमी UPSC परीक्षेत बुलढाण्याचा भूमीपुत्राचे यश, स्वप्नील वायाळ ने करून दाखवलं

UPSC परीक्षेत बुलढाण्याचा भूमीपुत्राचे यश, स्वप्नील वायाळ ने करून दाखवलं

88
0

रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) वतीने घेण्यात येणाऱ्या भारतीय वन सेवा (Indian Forest Service) परीक्षेत टाकरखेड वायाळ ( ता. देऊळगाव राजा ) येथील स्वप्नील अनिरुद्ध वायाळ याने देशात ४० वा तसेच महाराष्ट्रात ४ था क्रमांक पटकावला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

स्वप्नील सांगली येथील वालचंद कॉलेज येथे इंजिनिअरिंग ला असताना त्याचे वडील वारले. घरची शेती व आप्त परिवार सांभाळून त्याने शिक्षण पूर्ण केले. दोन वर्षे पुणे येथील schaeffler इंडस्ट्रीज मध्ये अनुभव घेऊन राजीनामा दिला.

लोकसेवा आयोगामार्फत भारतीय वन सेवे साठी २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी जून मध्ये पूर्व परीक्षा तसेच डिसेंबर मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण उमेदवारांचा फेब्रुवारी मध्ये मुलाखतींचा टप्पा पार पडला होता. स्वप्नील वायाळ याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. आयोगाने संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर केला आहे.