Home मराठवाडा शेतकऱ्यांच्या हक्काचा वाढीव पिकविमा देण्यात यावा अन्यथा तिव्र अंदोलन छेडु  – कावळगांवकर

शेतकऱ्यांच्या हक्काचा वाढीव पिकविमा देण्यात यावा अन्यथा तिव्र अंदोलन छेडु  – कावळगांवकर

55
0

नांदेड , दि. ५ ; ( राजेश भांगे ) –
खरीप २०१९ चा पिकविमा विमा कंपनीने मंजुरा केला खरा परंतु दिलेला परतावा हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व भ्रम निराशा करणारा आहे. अर्धवट व तटपुंजी पिकविमा देऊन शेतकऱ्यांची क्रुर थट्टा करणाऱ्या त्या पिकविमा कंपनी वर व संबंधित अधिकाय्रां वर तात्काळ गुन्हे दाखल करून व शेतकऱ्यांच्या हक्काचे वाढीव पिकविमा त्वरीत मिळवुन देण्यासाठी प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास येसगे कावळगांवकर यांच्या नेत्रत्वाखाली दि. ४ मार्च रोजी देगलूर महसुल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप २०१९ अंतर्गत अतिव्रष्टिने नुकसान झालेल्या सोयाबीन व ज्वारी पिकांसाठी तटपुंजी विमा रक्कम मंजुर करून विमा कंपनीने शेतकऱ्यांची घोर फसवनुक केली. अतिव्रष्टि झाल्या नंतर क्रमप्राप्त असतानाच विमा कंपनीने पंचनामे केले नाहित. क्रषी व महसुल प्रशासनाने पंचनामे करून ९० ते ९५ टक्के नुकसानी चे बनविल्या नंतर हि पिकविमा कंपनीने १५ ते २० टक्के च इतकी तटपुंजी रक्कम परतावा म्हणुन मंजुर केले. असल्याने हे खुपच अन्याय कारक आहे. देगलूर , बिलोली व मुखेड तालुक्याच्या महसुल मंडळातील काही शेतकऱ्यांना तर खुपच कमी रक्कम मंजुर करण्यात आला आहे.
४२ हजार हेक्टरी इतकी संरक्षीत रक्कम मिळणे अपेक्षित असताना हेक्टरी फक्त ४ हजार ते ९ हजार एवढी अल्प रक्कम मंजुर करून शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पुसन्याची क्रुरा चेष्टा विमा कंपनीने केली आहे.