Home विदर्भ अन , त्याने जन्मदात्या बापास मारून टाकले…!!

अन , त्याने जन्मदात्या बापास मारून टाकले…!!

48
0

अमीन शाह

नागपूर , दि. ०५ :- लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथे आज दुपारी ४.३० वाजता दरम्यान थरारक घटना घडली. रोजच्या भांडणला कँटाळून चक्क मुलाने जन्मदात्याच्या डोक्यात लाकडी बल्लीने प्रहार करुन जागीच मुडदा पाडला. घटनेनंतर आरोपी मुलाने लाखनी पो. स्टे. गाठून समर्पन केले ताराचंद पिसाराम टिचकुले (५२) असे मृतकाचे नाव आहे तर लोकेश ताराचंद टिचकुले (२१) असे आरोपी मूलाचे नाव आहे.
सविस्तर असे की, ताराचंद टिचकुले हा शेतकरी आहे. तर मुलगा लोकेश हा एका खाजगी कमपनीत कामावर आहे. मृतक याला दारुचे व्यसन होते. दारू पिवून रोजच घरी भांडण करीत होता. तसेच नेहमीच घरच्या लोकांना मारझोड करीत होता. आज. दि. ५ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता दारू पिवून लोकेश याला माझी स्पेंल्डर मोटारसायकल मला परत कर असे म्हणून शिवीगाळ केली. अंगणातील लाकडी बल्ली घेवून मुलाला मारण्यास धावला. मुलगा लोकेश याने वडीलाच्या हातातील लाकडी बल्ली हिसकावून त्याच्या डोक्यावर प्रहार केला. क्षणातच ताराचंद रक्ताच्या थारोड्यात पडला व जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती गावात वाNयासारखी पसरली. गावकरयांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक मंडलवार आपल्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठले. घटनेच्या पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरीता लाखनीला पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे यांनी घटनास्थळी जावून घटनेची माहिती जाणून घेतली. पुढील तपास लाखनीचे ठाणेदार दामदेव मंडलवार करीत आहेत. जितेंद्र टिचकुले याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन लाखनी येथे कलम ३०२ भादंवी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचे आत्मसमर्पण लाकडी बल्ली घेवून मारण्यास धावलेल्या वडीलाच्या हातातील लाकडी बल्ली हिसकावून त्याच्याच डोक्यात हाणली. त्यातच तो जागीच गतप्राण झाला. घटनेनंतर आरोपी मुलगा लोकेश याने लाखनी पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले.

Unlimited Reseller Hosting