Home महत्वाची बातमी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र च्या टीम मुळे रवी इन्फ्रास्ट्रक्चर च्या 29 ट्रकला...

युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र च्या टीम मुळे रवी इन्फ्रास्ट्रक्चर च्या 29 ट्रकला भातकुली च्या दबंग तहसीलदार वर्षा मीना यांनी ठोकला 81 लाख रुपयाचा दंड..

168

मनिष गुडधे

अमरावती , दि. ०५ :- गेल्या वीस दिवसांपासून आसरा, कावसा आणि ऋणमोचन या गावातून युवा लॉयन्स ग्रुप चा टीमला रोज फोन येत होते की रवी इन्फ्रास्ट्रक्चर चे ट्रक दिवस-रात्र अवैद्य उत्खनन करत आहेत. आणि वाहतूक करताना कुण्या दुसऱ्या वाहनाला साईट सुद्धा देत नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

गेल्या पंधरा दिवसापासून युवा लॉयन्स ग्रुप ची टीम आसरा गावाच्या बाजूला असलेल्या पंकज भाऊ देशमुख यांच्या 35 एकर शेतामधून मुरूम उत्खनन करण्याचे काम सुरू आहे तेथे जाऊन रवी इन्फ्रा स्ट्रक्चर च्या ट्रकला मिळालेली रॉयल्टी चेक करून लक्षात आले की एकाच रॉयल्टी वर दिवसभर हे ट्रक फेऱ्या मारत असतात.
रॉयल्टी ची मुदत संपून सुद्धा हे लोक उतरण करण्याचे काम सुरू सुरू ठेवत आहेत.
याप्रकरणी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
त्यावर मा. जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित ही बाब मा. तहसीलदार वर्षा मीना भातकुली यांच्या लक्षात आणून दिली.
त्यांनी लगेचच नायब तहसीलदार विजय मांजरे यांना घटनास्थळावर पाठवून सर्व ट्रक ला ताब्यात घेऊन रॉयल्टी सुद्धा जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या रॉयल्टीवर सुद्धा तारीख आणि मुदत हस्त रेखांकित आहे.
रवी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने महाराष्ट्र शासनाचां सुद्धा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला आहे.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व ट्रक ताब्यात घेऊन सर्व ट्रकवर पाच पटीने दंड आकारून 81 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे….