Home जळगाव भारतात डीटेन्शन कॅम्प चे बांधकाम झालेले आहे व होत आहे पंतप्रधानांच्या वक्तव्यावर...

भारतात डीटेन्शन कॅम्प चे बांधकाम झालेले आहे व होत आहे पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवू नका – सुरेश खैरनार

365
0

मुस्लिम मंच च्या ६४ व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू

रावेर (शरीफ शेख)

११ डिसेंबर रोजी रामलीला मैदानावर पंतप्रधान मोदी हे खोटे बोलले असून भारतातील सहा राज्यात डीटेन्शन कॅम्प चे बांधकाम झालेले असून काही राज्यात बांधकाम सुरू असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष तथा व प्लेस्टिन व भारताच्या मैत्री संघाचे अध्यक्ष सुरेश खैरनार नागपूर यांनी केले.
जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलना च्या बुधवारी ६४ व्या दिवशी खैरनार हे आंदोलनकर्त्यांची संवाद साधत होते.
त्यांनी पुढे असेही सांगितले की एन पी आर ला कोणत्याही प्रकारची माहिती कोणत्याही भारतीय नागरिकाने देता कामा नये ,तसेच भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटनाबाह्य असून मी सुद्धा सुप्रीम कोर्टात या कायद्याविरोधात पिटीशन दाखल केलेली आहे आपण कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता सरकारला एनपीआर साठी असहकार्य कार्य करा असे सांगून त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली .
आसाम येथील डी टेन्शन त्यामध्ये स्वतः जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलो आहे तरीही आपले पंतप्रधान ११ डिसेंबर रोजी रामलीला मैदानावर बोलतात की भारतात कुठेही डीटेन्शन कैम्प अस्तित्वात नाही हे संपूर्ण खोटे असून महाराष्ट्रात नवी मुंबई येथे सुद्धा डीटेन्शन कॅम्प चे बांधकाम सुरू आहे असा खळबळजनक खुलासा सुद्धा त्यांनी केला.

*धरणे आंदोलनात सहभाग*

धरणे आंदोलनाची सुरुवात इद्रीस बागवान यांच्या पवित्र कुराणाने झाली तर दुवा शरीफ शहा यांनी करून सांगता केली धरणे आंदोलनात डॉक्टर अमानुल्ला शहा, मुख्याध्यापक कदीर खान युसुफ शाह,आसिफ शेख, व सुरेश खैरनार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेसचे नदीम काझी, मेमन बिरादरीचे मजिद झकेरिया, शाह बिरादरीचे डॉक्टर जबी शाह, खान पठाण सय्यद बिरादरीचे अमजद पठाण ,देशपांडे कुलकर्णी व पटेल बिरादरीचे आसिफ देशपांडे ,मन्यार बिरादरीचे इक्बाल वजीर, सिकलिगर बिरादरीचे अन्वर सिकलिगर , व अफजल पठाण खाटीक बिरादरीचे रेहान शेख , बागवान बिरादरीचे गुलाब बागवान ,काकर बिरादरीचे मुस्ताक करिमी, पिंजारी बिरदारीचे हारून पिंजारी यासह गफ्फार मलिक, करीम सालार, सचिन धांडे, प्रतिभा शिंदे, फारुक शेख ,एम आय एम चे नगरसेवक हाजी सईद व वअक्रम देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.

*उपजिल्हाधिकारी भारदे यांना निवेदन*

काँग्रेसचे नदीम काझी यांच्या नेतृत्वाखाली रोशन पठाण, इद्रीस हाजी शफी बागवान, हाजी सईद, अकरम देशमुख, सय्यद वाजिद सय्यद आबिद,मुजफ्फर शेख सकीना शेख इस्माईल ,फ़ातमा शेख हसन अमिनाबी शेख कासम यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन देऊन आम्ही एन पी आर ची माहिती ती देणार नाही हे ठामपणे सांगितले.

Previous articleकेंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धात जि.प.उर्दु शाळा जामठी विजयी
Next articleयुवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र च्या टीम मुळे रवी इन्फ्रास्ट्रक्चर च्या 29 ट्रकला भातकुली च्या दबंग तहसीलदार वर्षा मीना यांनी ठोकला 81 लाख रुपयाचा दंड..
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here