जळगाव

केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धात जि.प.उर्दु शाळा जामठी विजयी

Advertisements

लियाकत शाह

जळगाव – जळगाव जिल्ल्यात बोदवड तालुका येथील ४ मार्चला संपन्न झालेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये जि.प.उर्दु शाळा जामठीचे विद्यार्थी विजयी ठरलेल्या, विजयी संघाचा आज जि.प.उर्दु शाळा येथील शाळा व्यवस्थापन समिती जामठी येथे, पालक, व शिक्षकांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले, यात जि.प उर्दु शाळाचे जामठी चे कबड्डी मोठा गट यानी कुर्हा हर्दोच्या संघाला १५-११ ने हारवले तसेच मुलींनी लंगडी मधिल मोठा गट मध्ये जिंकून प्रथम क्रमांक प्राप्त केले. तसेच लांब उडी, १०० मीटर धाव, मध्ये ही विद्यार्थ्यांने १ला व २रा क्रमांक प्राप्त केले. या सर्वांचा सत्कार करतांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अब्दुल रहीम व सदस्य शहाबुद्दीन मुलतानी, सोबत मुख्याध्यापक अयाज़ मुकरी, शिक्षक शारिक ज़ुबैर शाह, बादशाह, अकलीम, अतहर, जामठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक संजय राजपुत, शिक्षक वंजारी, माळी, तुपकर, उर्दु कन्या शाळेचे शिक्षक सादिक अहेमद, मज़हर शाह, उपस्थीत होते.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...