Home बुलडाणा ठेकेदार साहेब “वेगावर” नियंत्रण लावाल का..?

ठेकेदार साहेब “वेगावर” नियंत्रण लावाल का..?

351

चांगले रस्ते नावालाच गतिरोधक नाही गावाला

देऊळगाव राजा – रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही परिसरातील जवळपास महामार्गाचे काम पूर्ण झालेले असून गावातुन गेलेल्या रस्त्याचे कांम ही पूर्ण झाले आहे.
रस्ते तळहाता सारखे सरळ तर झाले परन्तु येथे भारतीय स्टेट,बस्थानक चौक,डिग्रस चौक, शिवाजी शाळा, ग्रामीण रुग्णालय ते स्वामी शाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असते,
त्याच बरोबर जि. शाळा ह्या रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून जावे लागत आहे यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या व वयोवृद्ध इस्मानच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
शाळकरी मुलांना मुश्किलीचा सामना करावा लागत आहे,
वाहने बेदरकारपणे चालवत असल्यामुळे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना मुश्कील होत आहे.
मागील काही दिवसात ३,४ अपघात झाले परन्तु सुदैवाने कोणती ही जीवित हानी ना होता किरकोळ दुखापत झाली,
अशे छोटे कोठे अपघात होत असल्याने सतत बस्थानक चौक, डिग्रस चौक, शिवाजी शाळा, ग्रामीण रुग्णालयात, स्वामी शाळा या समोर गतिरोधक लावण्याची मागणी जनतेतून ,विद्यार्थी पालक वर्गातून होत आहे.
सदर प्रश्नावर संबंधित ठेकेदार, प्रशासनाने अमल बजावणी केली नाही तर गावातून जनआंदोलन उभारू असा इशारा पालकवर्गाने दिला आहे .
याबाबत संबंधित ठेकेदार साहेब तेज गती ने चालणाऱ्या वाहनांवर नियंत्रण लावणार का..?हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
येणाऱ्या काळात देऊळगाव मही येथील गतिरोधकाचा ज्वलंत प्रश्नावर ठेकेदार साहेब पूर्णविराम लावतात की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल त्यामुळे तूर्तास जनता जनार्धनाने वेट अँड वॉच च्या भूमिकेत जरी असली तरी या प्रश्नावर देऊळगाव मही येथे सर्वपक्षीय लोक आंदोलन उभे राहिले एवढे मात्र नक्की.

रस्ते तर बनले पण “ट्राफिक” मध्ये फसले…!

परिसरात तळहाता सारखे रस्ते तयार होऊन सुरळीत रित्या चालू होण्या जोगते झाले आहे परन्तु तरी देऊळगाव मही गावातून एकतर्फीच रस्ता सुरू आहे तर दुसरीकडे संपूर्ण रस्त्यावर बाजार मांडलेला आहे तो गाड्यांचा व इतर दुकानांचा.
याबाबत पोलिसांमध्ये उदासीनता दिसत आहे तर पोलिसांवर येथील राजकीय दबाव आहे का..? ट्राफिक बाबत दोन्ही बाजू जे रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस प्रशासन का पुढाकार घेत नसेल ? असे अनेक चर्चांना उधाण आले आहे …
त्याचबरोबर स्थानिक पातळीवर राजकीय उदासीनता ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
आता प्रश्न निर्माण होत आहे की दोन्ही कडून रस्ता तयार होऊन ही जर देऊळगाव मही येथील ट्राफिक समस्या दूर होत नसेल तर ही समस्या कशी व कधी सुटणार.
याबाबत शासन ,प्रशासन,तसेच गावातील राजकीय नेते नेमकं कोणते पाऊल उचलत, यावर कोणती कारवाही करत यावर आपली नजर असणारच आहे.