Home मराठवाडा रक्तदान,वृक्षारोपण,प्रबोधनपर व्याख्यान आदी उपक्रम करुन घुंगराळा येथे शिवजयंती साजरी.

रक्तदान,वृक्षारोपण,प्रबोधनपर व्याख्यान आदी उपक्रम करुन घुंगराळा येथे शिवजयंती साजरी.

68
0

नांदेड , दि.४ – ( राजेश भांगे ) –
तालुका नायगांव ( बा.)घुंगराळा येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर,वृक्षारोपण आदी कार्यक्रम आयोजीत करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमांचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील ,कुंटूर पोलीस स्टेशन चे साह्याक पोलीस निरिक्षक पठाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच प्रतिनिधि बालाजीराव मातावाड,व्यंकटराव सुगावे, डॉ. कोल्हे साहेब,नारायण पा.ढगे,बालाजीराव हाळदेवाड,भीमराव यमलवाड,मोहन पा.सुगावे,मुरहरी तुरटवाड,नागोराव दंडेवाड,संजय गजभारे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी नांदेड येथील श्री.गुरू गोबिंदसिंह ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले.यानंतर गावतील खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वसंत सुगावे पाटील,पठाण साहेब यानी मनोगत व्यक्त करुन सदर कार्यक्रमाचे कौतुक केले.
यानंतर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची गावातील प्रमूख रस्त्यांवरुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील तरुणांनी शिवरायांचा जयजयकार करत या मिरवणूकित सहभागी होऊन मिरवणुक शांततेत व जलोषात पार पाडली.
यानंतर सायंकाळी शिवव्याख्याते धनराज पा.बाभळीकर यांचे शिवचरितत्रावर व्याख्यान झाले.या व्याख्यानाच्या कार्यक्रमास गावातील नागरिक,महिला,तरूण आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परभता हणमंते यानी केले.
शिवजयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवजयंती मंडाळाचे अध्यक्ष शिवराज ढगे,रोहीदास ढगे,मोहन पा. सुगावे,योगेश सुगावे,विशाल ढगे,योगेश ढगे,आकाश कदम,साई सुगावे,नितीन सुगावे,आकाश कळकटवाड,साईनाथ बोधनकर,राजेश ढगे,राजू आलेगटलेवार यानी परिश्रम घेतले.