Home विदर्भ कामरगावात भर दिवसा आठ लाख दोन हजार पाचशे रुपयाची धाडसी चोरी…

कामरगावात भर दिवसा आठ लाख दोन हजार पाचशे रुपयाची धाडसी चोरी…

29
0

कारंजा प्रतिनिधि

वाशिम , दि. ०४ :- कामरगाव येथील बालाजी नगर येथे भरदिवसा आठ लाख 2 हजार 500 रुपयांची धाडसी चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल , पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी नगर येथील रहिवासी असलेल्या फातेमा शेरखा ह्या पतीसह राहतात शिक्षिका असून सकाळी साडेदहा वाजता शाळेत गेले असता दुपारी मध्यहनच्या सुट्टीत घरी आले दरवाजा आत मधून बंद असल्याचे निर्दशनास आले .

तसेच आत मधील दरवाजाचे कुलूप तुटलेले होते कपाट व आतील लॉकर तोडुन त्यामधील रोख आठ लाख व दोन हजार पाचशे रुपये नोटा चिल्लर नोटा असा एकूण आठ लाख 2 हजार 500 रुपयांचे चोरी झाल्याची घटना फिर्यादी फातिमा शेख यांनी दिली त्यानुसार अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव करीत आहे तसेच मागील वर्षातील मागील एक वर्षातील गावातील तिसरी चोरीची घटना असून एकही चोरीचा तपास लावण्यास पोलीस असमर्थ ठरले आहे. गतवर्षी साईनाथ ज्वेलर्स दुकान फोडून 22लाखाची चोरी झाली होती त्या चोरीच्या एक महिना अगोदर परंपरा ज्वेलर्स चे दुकान फोडून तीन लाखाचे ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता परंतु अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Unlimited Reseller Hosting