Home मराठवाडा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे गुरुवारी आयोजन – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे...

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे गुरुवारी आयोजन – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे मार्गदर्शन

63
0

नांदेड दि. ४ ; ( राजेश भांगे ):- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवार ५ मार्च २०२० रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर गुरुवार ५ मार्च २०२० रोजी सकाळी १०.३० ते सायं ५ या वेळेत नांदेड नुतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे विद्यार्थ्यांना मार्गदशन करणार आहेत. चालू घडामोडी या विषयावर पुणे येथील प्रा. स्वप्नील सानप मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन शिबिरास स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.