Home मराठवाडा सेंट जॉन हायस्कुल मध्ये कवी कुसुमाग्रज जयंती मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात...

सेंट जॉन हायस्कुल मध्ये कवी कुसुमाग्रज जयंती मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

87
0

सययद नजाकत

जालना , दि. ०३ :- शहरातील सेंट जॉन हायस्कुल मध्ये गुरुवारी कवी कुसुमाग्रज जयंती मराठी भाषा गौरव दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले .

जालना शहरातील सेंट जॉन हायस्कुल मध्ये मराठी भाषा दिवसानिमित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली यावेळी बायबल वाचन,मराठी वाचन,प्रार्थना,कविता वाचन,पर्यावरण सुरक्षा,नाट्य आदी वर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए एफ पिंटो,संचालिका ग्रेस पिंटो,मराठवाडा समानव्याक रुबन फ्रॅंक यांनी मराठी दिवसानिमित शुभेच्छा दिले .