Home विदर्भ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यवतमाळ जिल्ह्याची बैठक संपन्न व जिल्हाधिकार्‍यांना...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यवतमाळ जिल्ह्याची बैठक संपन्न व जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन

338

यवतमाळ , दि. ०३ :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची यवतमाळ जिल्ह्याची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक 03/ मार्च/ 2020 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) यवतमाळ येथे विदर्भ अध्यक्ष विजय कुमार बुंदेला यांच्या अध्यक्षतेखाली, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनील भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष विजय कुमार बुंदेला यांनी संघटनेच्या समस्त पत्रकार बंधुना मार्गदर्शन करुन पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी एकजुटीने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात संघटन शक्ती कशी वाढेल? या दृष्टीकोणातून प्रयत्न करुन आपले संघटन कसे सशक्त होईल यावर बळ दिले. तद्नंतर पत्रकारांचे शिष्ट मंडळ विदर्भ अध्यक्ष विजय कुमार बुंदेला, जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे, मकसुद अली आदिंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये सर्वच पत्रकारांची शासन दरबारी नोंद ठेवणे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशस्त पत्रकार भवन निर्माण करणे, एस.टी.बस व रेल्वे प्रवासात सर्व पत्रकारांना तिकीटामध्ये 75 सवलत देणे, महाराष्ट्रातील सर्व शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांना कामानिमित्त गेल्यानंतर राहण्याची सोय मोफत करून देणे, पत्रकार संरक्षण कायदा प्रभावीपणे आमलात आणणे, सर्व संघटनेच्या पदाधिका-यांना शासनाच्या वतीने वेळोवेळी पत्रकार संबंधित ध्येय धोरणे ठरवित असतांना कमेटीमध्ये सामिल करून घेणे, सरसकट साप्ताहिकांना शासकीय जाहित , पत्रकारांना विमा संरक्षण देणे, संपादक व पत्रकारांना 10 लाखापर्यंत आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देणे, पत्रकारांना मासिक मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, संपादक व पत्रकारांना टोलमाफी करून देणे, 1 लाख 44 हजार साप्ताहिकांना लावलेला दंड मागे घेणे, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा मिळवून देणे, पत्रकारांसाठी गृह योजना, पत्रकारांना अधिस्विकृतीसाठी बातमी कात्रणे हा एकमेव पुरावा ग्राह्य धरावा, त्यासाठी शासनाने तातडीने अधिसूचना जारी करण्यासाठी प्रयत्न करणे, 60 वर्षाच्या पुढील पत्रकारांना दरमहा 15,000 रू पेन्शन देणे, ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रावर पत्रकारिता करणा-या पत्रकारांना संरक्षण देणे, पत्रकारांवरील हल्याबाबत पोलिसांनी हल्लेखोरांवर दखलपात्र गुन्हे दाखल करणे, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलची शासन दरबारी नोंद करणे, न्यूज पोर्टलला शासकीय जाहिराती मिळवून देणे, नवीन पदाधिकारी यांची सभासद नोंदणी करणे, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांची जिल्हा स्तरावर नोंद ठेवणे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या प्रसंगी मोहम्मद नदीम, कपिल अंगलवार, अब्दुल रङ्गीक, मोहम्मद मतीन, सै. मतीन, वशिम शेख, आनंद नक्षणे लक्ष्मण वानखडे, सतीश उरकुडे, पंकज नेहारे, अमोल सांगाणी, रुस्तम शेख, रङ्गीक सर, मकसुद अली, सचिन मेश्राम, सुरज बंडूजी झोडींग, रोहण आदेवार, सचिन काकडे, मोहन कळमनकर, आनंतराव गोवर्धन, प्रङ्गुल इंगोले, प्रदीप पेंडेवार, उदय पुंडे, आदि सह जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे यांनी कळविले आहे.