जळगाव

दहाविचा पेपर मराठी विषयाचा फुटला….!

शरीफ शेख

जळगाव , दि. ०३ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी दहावीचा भाषा (मराठी)विषयाचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती मिळत आहे. हा पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर आल्यानं खळबळ उडाली. या घटनेची तक्रार दाखल केली असता केंद्र प्रमुखांनी शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केलं आहे. तालुक्यातील एकाच केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट आहे. पहिल्याच दिवशी अशा प्रकारे कॉपी सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

राज्यातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. ही परीक्षा 03 मार्च ते 23 मार्चपर्यंत होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत होत आहेत. 9045 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश असणार आहे. कॉपी आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मार्च 2020 पासून 80 गुणांची लेखी 20 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे. 10 वीची परीक्षा देण्यासाठी गेल्यावर्षी पेक्षा यंदा 65 हजार 25 विद्यार्थी संख्या जास्त असल्याचंही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...