Home उत्तर महाराष्ट्र ख्वाजा गरीब नवाज ला अभिवादन करून मुस्लिम मंच चे धरणे आंदोलन सुरूच

ख्वाजा गरीब नवाज ला अभिवादन करून मुस्लिम मंच चे धरणे आंदोलन सुरूच

64
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव , दि. ०३ :- मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध व एनपीआर एनआरसी चा बायकॉट म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बसलेल्या आंदोलनाचा सोमवार ६२ वा दिवस या दिवशी अजमेर येथील खाजा गरीब नवाज यांचा पुण्यतिथीचा दिवस असल्याने तांबापुर येथील सुन्नी मस्जिद च्या लोकांनी येऊन आपला विरोध दर्शविला.

*धरणे आंदोलनाला सुरुवात*

६२ व्या दिवसाच्या धरणे आंदोलनाची सुरुवात अवलिया मज्जित इमाम हाफिज रेहान रजा यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली व सांगता सुन्नी मस्जिद चे विश्वस्त शरीफ शाह यांच्या दुवाने करण्यात आली.

फारुक शेख ,युसुफ बॅटरी वाले, नगरसेवक रियाज बागवान,फारूक अहलेकार, सरपंच सतीश पाटील, करीम सालार ,रशीद जनाब, युसूफ खान, हाजी इक्बाल वजीर, शरीफ शाह, वसीम अत्तारी, रागिब ब्यावली व सायमा जाकीर यांनी आंदोलकांशी सुसंवाद साधून एन पी आर चा बायकॉट कसा करावा हे समजून सांगितले.
मुफ़्ती हारून, हाफिज रशीद हाफिज शाहिद, आयशा बी, जमिला बी, यांची विशेष उपस्थिती होती.
*खाजा गरीब नवाज पूण्य तिथि निमित्त आंदोलन कर्ते व जाणारे येणारे लोकांना खीर वाटन्यात आली*

*सायमा व रागिब ब्यावली यांच्या कविता*
हर एक हिंदू मुसलमान, शीख ईसाई सभी का भारत है।
सभी हम भाई-भाई है हर एक भाई का भारत है। (सायमा)

सारी दुनिया मे तेरी तरहा कोई देखा नही
कोई भी मजलुम दुनिया मे तेरे जैसा नही
जुल्म इतने सह के भी तुम जिंदा हो मै हैरान हू
यह बताओ कौन हो ,बोला के हिंदुस्तान हु मै(रागिब)

*उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन*
उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना इकबाल वजीर यांच्या नेतृत्वात रफिक शेख करीम, विकार खान, सलीम शेख नादर, सय्यद सलीम हसन, सय्यद इब्राहिम सय्यद इस्माईल, मेहमुदा बी शेख ,फरजाना सय्यद,आयशा पठाण जमीला शाह यांनी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन दिले.