Home जळगाव अडावद जि.प. उर्दू शाळेत बक्षीस वितरण

अडावद जि.प. उर्दू शाळेत बक्षीस वितरण

46
0

रावेर (शरीफ शेख)

तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटी यावल व आदिल शाह फारुकी बहुउद्देशिय संस्था अडावद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे आज बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या अमिना बी रज्जाक तडवी ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून अडावद पो.स्टे. चे सपोनि श्री योगेश तांदळे व तुबा नाज संस्थेचे सचिव अल्ताफ शेख यावल,शेख अब्दुल कादिर धानोरा हे उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक *फारूक शाह नौमानी यांनी मांडले तर अब्दुल रज्जाक मण्यार यांनी सूत्रसंचालन केले
यावेळी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थी, विद्यार्थीनीना पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच सर्व शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सपोनि योगेश तांदळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये ग्राप सदस्य जावेद खान,शेख शकील,कालू मिस्त्री,शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष सैय्यद फारूक अली,शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष इम्रान खान,अमजद मलक,रुबाब तडवी,इम्रान खान मण्यार,साबीर खान,शेख सैफोद्दीन, शेख सलाउद्दीन आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उर्दू मुला-मुलींच्या शिक्षक वर्गाने महत्त्वाचे योगदान दिले व उपस्थितांचे आभार फारूक शाह नौमानी यांनी व्यक्त केले.

Unlimited Reseller Hosting