
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळ येथील कोळीवाड्यात तालुक्यातील साकेगाव येथील दूग्धविक्रेत्याचा ग्राहकाने डोक्यावर सपासप लोखंडी राॅडने वार करूत खून केल्याची घटना आज दि.२ मार्च रोजी सायंकाळी ५:३०वाजेच्या सुमारास घडली.
मामाजी टॉकीज रस्त्यावरील विशाल दुग्धालय या दूध डेअरी वरून गल्लोगल्ली दूध वाटप करणारा साकेगावचा युवक नसीर बशीर पटेल (३९) हा संध्याकाळी कोळीवाड्यात दूध वाटपास गेला असता धिरज गणेश शिंदे(वय २२)या तरूणाने नसीर पटेल यांच्या डोक्यात दोन-तीन वेळा लोखंडी राॅडने वार केल्यामुळे नसीर जागेवरच गतप्राण झाला.निर्घुणपणे झालेल्या खुनाचे नेमके कारण उशिरा पर्यंत कळू शकले नाही, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड,बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत,वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ सुरडकर, यांच्यासह नगरसेवक गिरीश महाजन,सतीश सपकाळे,भिमराज कोळी, युवराज पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.
घटना घडल्यानंतर ॲम्बुलन्स न आल्यामुळे मृत्यू देह घटनास्थळी एक तासापासून पडून होते.एका तासानंतर मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत नसीरच्या पश्चात पत्नी,२ मुले,२ मुली,वडील, भाऊ,बहीण असा परिवार आहे.