Home मराठवाडा बदनापूर नगर पंचायत चा मनमानी कारभार उघड

बदनापूर नगर पंचायत चा मनमानी कारभार उघड

55
0

शहरातील घरकुल नकाशे व इतर कामासाठी अधिकृतरित्या एका नगरसेवक पुत्राची देखरेख अभियंता म्हणून नियुक्ती…!

बदनापूर – सय्यद नजाकत

जालना , दि. ०३ :- बदनापूर नगर पंचायत चा मनमानी कारभार उघड झाला असून शहरातील घरकुल नकाशे व इतर कामासाठी अधिकृतरित्या एका नगरसेवक पुत्राची देखरेख अभियंता म्हणून नियुक्ती केल्या प्रकरणी उपनगराध्यक्ष सहित अन्य नगरसेवकांनी आवाज उठविल्याने त्या पुत्राची अधिकृत नियुक्ती करण्यासाठी उद्या होणाऱ्या मासिक सभेत विषय पत्रिकेवर विषय घेण्यात आला असून उद्या होणाऱ्या सभेत नियुक्ती विषयी ओरड करणाऱ्या नगरसेवकांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे तदनंतर उपनगराध्यक्ष शेख युनूस व नगरसेविका प्रीती साबळे यांनी देखील तक्रार केली होती मात्र सदर नियुक्ती नियमानुसार केल्याचा कांगावा करण्यात आला आमदार नारायण कुचे यांचा अप्रत्यक्ष सहभाग दाखविण्याचा प्रयत्न नगरसेविका पतीने सोशल मीडियावर ऑडिओ व्हॅयरल करून केला

दरम्यान सदर नियुक्ती प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतांना उद्या होणाऱ्या मासिक बैठकीची नोटीस नगरसेवकांना देण्यात आली असून या बैठकीत विषय पत्रिकेवर 9 क्रमांक चा विषय कंत्राटी नियुक्ती साठी घेण्यात आला असून सदर नियुक्ती अधिकृतरित्या करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने उद्याच्या बैठकीत विरोध करणारे नगरसेवक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे ,यासाठी आर्थिक व्यवहार व ओली पार्टीची किमया ठरते की अपयश येतो हे उद्या नक्की होणार आहे

बदनापूर नगर पंचायत ने शहरात मंजूर झालेले पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांचे बांधकाम नकाशे व देखरेखीसाठी प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेविकेच्या पुत्राची कोणताही ठराव न घेता उपनगराध्यक्ष सहित सत्ताधारी नगरसेवकांना अंधारात ठेऊन नियुक्ती केल्याचे सविस्तर वृत्त आम्ही प्रकाशित केले होते ,