Home उत्तर महाराष्ट्र संजय यु.पाटील यांना “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक”पुरस्काराने केले सन्मानित

संजय यु.पाटील यांना “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक”पुरस्काराने केले सन्मानित

176

अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक,सिनेअभिनेते,नाट्यलेखक तथा गीतकार संजय उत्तमराव पाटील यांना नेवासा फाटा येथे,शरणपूर वृद्धाश्रम आयोजित माननीय आमदार निलेश लंके यांच्या हस्ते “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच संजय यु.पाटील यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला.संजय उत्तमराव पाटील यांनी स्वतः सगेसोयरे, अकलेचे कांदे,सख्खा सावत्र,कालभैरव,ट्राफिक जॅम,व्हीआयपी गाढव हे चित्रपट स्वतः दिग्दर्शित केले आणि हे चित्रपट चांगले यशस्वी झाले.तसेच दूरदर्शन वाहिनीवरील दक्षता,पोतराज,आनंदमहिमा,लढा आदी टीव्ही मालिकांचं दिग्दर्शनदेखील त्यांनी केले.या मालिका चांगल्या यशस्वी झाल्यात.तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील प्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार, संगीतकार, कथा पटकथा लेखक तथा भारतीय पत्रकार संघटनेचे तालुकाअध्यक्ष योगेश तुळशीराम मोरे यांनी लिहिलेल्या “भरकटलेल्या पक्ष्याचा किलबिलाट”या कादंबरीला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, “द श्रील चर्प ऑफ अ लॉस्ट बर्ड” ही कादंबरी वाचकांच्या सोयीसाठी इंग्रजी या भाषेत अमेझॉनवर देखील उपलब्ध करण्यात आली आहे,या दोनही कादंबरीवर आधारित लवकरच एक धमाल विनोदी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील “संजय यु.पाटील”तसेच “सहदिग्दर्शन वरून पाटील”करणार असून,विशेष म्हणजे या चित्रपटात ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी देण्यात येणार आहे.