Home सोलापुर नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही – तृप्ती देसाई.

नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही – तृप्ती देसाई.

257
0

वागदरी / नागप्पा आष्टगी

महाराष्ट्रात महिला ,पुरूष किर्तनकार मोठ्या प्रमाणात आहेत.चांगले प्रबोधन करून समाजात एकता निर्माण करतात ,समाज घडवितात असे किर्तनकारांचे स्वागत करू,मात्र किर्तनातुन महिलांचे अपमान करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही .त्यांच्या विरोधात नारी शक्ती रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्पा बसणार नसल्याचे प्रतिपादन भूमाता ब्रिगेडचे संस्थापिका अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले.

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील स्री शक्ती महिला मंडळाचे उध्दघाटन करून त्या बोलत होत्या .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी समर्थ अन्नछत्र मंडाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले होते.शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमास डाँ.उदय म्हेत्रे,जि प सदस्य आनंद तानवडे ,महिला व बालकल्याण सभापदी स्वाती शटगार,सरपंच ललिताबाई ढोपरे,भाजपा महिला अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी ,अक्कमहादेवी चित्रपट निर्माता राजश्री थळंगे,पी.एस.आय निर्भय पथक प्रमुख सोनाली पाटील,शुभांगी मुंडे,रागिणी फोंडेशनचे अध्यक्षा राजश्री आगम ,माजी जि प सदस्य विजयकुमार ढोपरे , राजकुमार यादव ,रतन बंगरगी ,घाळय्या मठपती ,प्रशांत देसाई ,अमोल रजपुत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की,राज्यात कोणी महिलांचे चारित्र हनन करून स्व:ताला प्रसिध्दी मिळवुन घेत असेल ,महिलावर अन्याय अत्याचार करीत असेल व महिलांचे न्याय हक्काला कोणी बादा आणत असेल तर स्री गप्पा बसणार नाही .महिलांना पुरूषाच्या बरोबरीने न्याय मिळाला पाहिजे हे प्रमुख मागणी असल्याचे स्पष्ट करून त्या म्हणाल्या की,१२ व्या शतकांत बसवेश्वरांनी स्री पुरूष समानेतेचे संदश दिले आहे.त्याची अंमलबजावणी १९५० ला झाली .