Home मराठवाडा “कौतुकास्पद” महाराष्ट्राच्या माधुरी कानेटकर यांची लेफ्टनंट जनरल पदी निवड

“कौतुकास्पद” महाराष्ट्राच्या माधुरी कानेटकर यांची लेफ्टनंट जनरल पदी निवड

139

नांदेड , दि.२ ( राजेश भांगे ) –
पुन्यातील लष्कराच्या वैद्यकिय महाविद्यालाच्या माजी अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी किनिटकर यांची लेफ्टनंट जनराल या पदी निवड झाली.
अनेक महिन्यांन पासुन या पदावर त्यांच्या नावाची चर्चा होती.
तरी शनिवारी दि.२९ फेब्रुवारी रोजी माधुरी कानिटकर यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले व शनिवारी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॕनर्जी , तसेच त्यांच्या पति माजी लेफ्टनंट जनरल राजीव कानैटकर यांच्या हस्ते त्यांना लेफ्टनंट पदाची रँक बहाल करण्यात आली. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला तर देशातील तिसऱ्या महिला आधिकारी ठरल्या आहेत. या नंतर पुढे त्या डेप्युटि चीफ इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या प्रमुख म्हणून काम सांभाळतील. तरी सध्या त्या उधमपुरच्या युद्ध चिकित्सक विभागाच्या प्रमुख आहेत.
लेफ्टनंट जनरल पदी निवड झाल्या बद्दल माधुरी कानेटकर यांचे पोलिसवाला आॕनलाईन न्युज ग्रुप तर्फे खुप खुप अभिनंदन