Home जळगाव खा. सुप्रिया सुळे यांना शेतरस्ते विकास योजना सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे...

खा. सुप्रिया सुळे यांना शेतरस्ते विकास योजना सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे निवेदन.

22
0

रावेर – शरीफ शेख

रावेर तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांच्या जळगाव दौऱ्यावेळी महाविकास आघाडी तर्फे शेतरस्ते विकास योजना सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात येऊन त्या योजनेस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा शेतक-यांचे नेते खा.शरदचंद्र पवार यांचे नाव देण्यात येण्याची म्हणी ही करण्यात आली.शेतशिवारातील रस्त्यांची माती सुपीक असल्याने शेतरस्ते दीर्घकाळ टिकत नाही त्यामुळे पावसाळयात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.खा शरद पवार यांचे शेती व शेतक-यांविषयीचे प्रेम व आवड पाहता शरदचंद्र पवार शेतरस्ते विकास योजना महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू करावी जेवकरून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता झाल्यास शेतमालाची प्रतवारी चांगली मिळुन शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पन्न ही वाढेल.असे निवेदनात कळविले आहे.खा.सुप्रिया सुळे यांनी निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी सुनिल कोंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड रविंद्रभैय्या पाटील,राष्ट्रवादीचे माजी जिप गटनेते विनोद तराळ,मुक्ताईनगरचे तालुकाध्यक्ष ईश्वर रहाणे यांच्यासह अन्य राष्ट्रवादीचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.