Home मराठवाडा दहा दिवसात खड्डे बुजविले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांनावर गुन्हे नोंदवा – उच्च...

दहा दिवसात खड्डे बुजविले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांनावर गुन्हे नोंदवा – उच्च न्यायालयाचा खंडपीठाचे आदेश

74
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०२ :- यापुढे औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट संबंधित विभागावार गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.

औरंगाबाद : यापुढे औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट संबंधित विभागावार गुन्हे दाखल करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने हे आदेश दिल्याने संबंधित विभागांचे धाबे दणाणले आहेत. तसेच यासाठी न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांसाठी संबंधित यंत्रणांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान, ट्विटरवरुनही तक्रार करता येणार आहे.

औरंगाबादच्या रस्त्यावर असे खड्डे नेहमीचेच, कितीही ओरडा मात्र महापालिका असो वा सार्वजनिक बांधकाम विभाग कुणालाही फरक पडत नाही. यावरच आता औरंगाबाद खंडपीठाने तोडगा काढला आहे, यापुढे रस्त्यावर खड्डे दिसल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांची नागरिकांनी तक्रार केल्यानंतर १० दिवसांत संबंधित विभागाने ते खड्डे बुजवायचे आहेत, तसे झाले नाही तर तीन दिवसांत पोलिसांनी शहानिशा करून गुन्हे दाखल करावे, असेही आदेश पोलिसांना दिले आहेत. याबाबत जहित याचिका वकील रुपेश जैस्वाल यांनी केली होती.

औरंगाबाद महापौर नंदकुमार घोडेले यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता लोकप्रतिनिधी निर्णयाचं स्वागत करत आहे. मात्र प्रशासनाकडून हे काम करून घेऊन खड्ड्यातून सर्वसामान्यांची आणि वाहन चालकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.

तक्रार असल्यास या हेल्पलाईन
औरंगाबाद मनपा हेल्पलाईन – 9607933541

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ – 9403884731

औरंगाबाद पोलीस – 8396022222 / 7030342222